चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि. ९/०८/२०१८
चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपविभागीय कार्यलय समोर बैठक घेउन संपला १००%प्रतिसाद दिला,या संपामध्ये राज्य सरकारी कर्मचारी ,जि. प.शाळेतील शिक्षक ,ग्रामसेवक,इतर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा समावेश होता.राज्यातील कर्मचारी संघटना दि. ७ आगस्ट पासून तीन दिवस दिनांक ९आगस्ट पर्यंत आपल्या विविध रास्त मागण्या घेऊन संप पुकारला होता ,सातवा वेतन लागू करावा,जुनी पेंशन योजना लागू करा,२३/१०चा जी,आर,रद्द करा,शिक्षक सेवक योजना बंद करा,ऑनलाईन कामे बंद करा अशा समस्या घेवून संप पुकारला होता संपामध्ये श्री,ना,रा,कांबळे सर,केळझरकर सर,पी,आर,कामडी, गुळधे सर,बोबडे मॅडम व आदी कर्मचारी उपस्थित होते.



















