सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०७.२०२१
पाटण- तालुक्यातील कोयना विभाग म्हणजे पावसाच माहेरघरच गेले दोन दिवस सलग पाऊस पडत आहे. एवढा की देशात चेरापुंजीला ही मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त यामुळे आज कोयना धरणातून १०००० क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.