सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, प्रियांका भोकरे
दि.२२/१२/१८
सातारा,तालुक्यातील जकातवाडी ही ग्रामपंचायत तिच्या वेगळ्या निर्णयांनी कायम लक्ष वेधून घेत आहे. ग्रामपंचायतीने निवडणुकीनंतर घेतलेला शपथविधीचा कार्यक्रम,कवितेचे गाव उपक्रम,मानस मित्र समुपदेशन केंद्राची स्थापना असे विविध सामाजिक उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले आहेत.ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि.१६ डिसेंबर २०१८ रोजी झाली. यामध्ये ग्रामसभेमध्ये महिला व पुरुष यांचा लोकसंख्येच्या प्रमाणावर चर्चा झाली.हे प्रमाण विषम असल्यामुळे तरुण मुलांच्या विवाहाचा सामाजिक प्रश्न तयार झाला आहे.तसेच वाढते अपघात व कॅन्सर हृदयरोग अशा आजारांनी तरुणपणात युवकांना येणारे मृत्यू यामुळे तरुणपणीच मुली विधवा होत आहेत.संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगणे हा तिच्यावर समाजाने लादलेला निर्णय आहे.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने ज्या विधवा मुलींचा अविवाहित तरुण मुलाशी पुनर्विवाह केला जाईल त्या विवाहासाठी ग्रामपंचायतीकडून वीस हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे असा ठराव ग्रामसभेने घेतला आहे आणि असा ठराव करणारी जकातवाडी ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे असे जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस यांनी सांगितले ग्रामसभेस उपसरपंच हनुमंत भोसले ग्रामपंचायत सदस्य उत्तम सणस सुजाता माने सखुबाई देशमुख सोनाली शिंदे बिस्मिल्ला शेख ग्रामसेवक धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















