चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.२१.०३.२०२०
चिमूर- आज चिमूर तालुक्यातील जनतेनी स्व स्फुर्तीने जनता कर्फ्यु मध्ये भाग घेतला आहे कोरोनाचे सावट संपूर्ण जगभरात पसरल्याचे दृश्य आपणास बघावयास मिळत आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका मिळवण्यासाठी देशपातळीवर आणि राज्य पातळीवर कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. आज चिमूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात आज कर्फुला उत्तम प्रतिसाद मिळाला असून पोलीस प्रशासनाने सुद्धा कसोशीने प्रयत्न करून जनता कर्फु ला प्रतिसाद देहून सुरक्षा दिली कोरोनावर विजय मिळविण्यासाठी जनतेनी शांतता, धैर्य, सहकार्य, सुरक्षित आणि नियंत्रीत राहण्यासाठी गर्दीपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन नगरपालिका, पोलीस प्रशासन, ते ग्रामीण भागातील ग्रामपंचायत नि दवंडी द्वारे जनतेला केली होती त्या हाकेला प्रतिसाद देत आज बंद यशस्वी केला. आपला संकल्पच कोरोनाला हरवू शकतो, त्यामुळे लोकांनी रस्त्यावर जाऊ नये, आज जनता कर्फ्यु असल्याने आपणास शहरी तथा ग्रामीण भागात सुद्धा मार्ग सुन्न झाले होते, रस्त्यावर निर्मनुष्यांची स्थिती बघायला मिळाली. गर्दी टाळा आणि नियम पाळा या उक्तीप्रमाणे ग्रामीण जनतेनी आपला संकल्प केला आहे. आपला संकल्पच कोरोनाला देशातून कायमचे हद्दपार करू शकतो.



















