पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.११.२०२०
पुणे – जनता वसाहत गल्ली नंबर ७७ जवळ वाघजाई मंदिराशेजारी महापालिकेने स्थनिक नागरिकांसाठी शौचालय आहे मात्र या शौचालयाची अवस्था दयनीय झाली आहे. आतील स्टाईल फरशी, दरवाजे, अगदी शौचालयाचे भांडे देखील गेली अनेक दिवसा पासुन तुटलेली आहेत या मुळे परिसरातीळ रहावशाचे अतोनात हाल होत आहेत. हे शौचालयाची निर्मिती झाल्या पासुन इथे कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देवून दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या परिसराची स्वच्छता करण्यात येत नसल्याने इथे दुर्गंधी पसरली आहे. हे शौचालय महापालिकेने बांधली असुन याकडे पालिका प्रशासनच दुर्लक्ष करत असल्याने याबाबत जनतेतून आश्चर्य व्यक्त करत संताप व्यक्त केला जात आहे.



















