जनता शिक्षण संस्थेत लोकशाहीचा उत्सव संविधान गौरव अभियान…
पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास ओव्हाळ
दि.२०.०१.२०२५
दापोडी- जनता शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यालय व किशोरीलाल गोयल महाविद्यालय येथे भारतीय संविधानाचे महत्व तसेच देशभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील अनेक क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवत असलेला लोकशाहीचा उत्सव संविधान गौरव अभियानाच्या माध्यमातून आज राबवण्यात आला,भारताची राज्यघटना,ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता,संरचना, कार्यपद्धती,अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये या विषयी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षकवर्ग तसेच युवक वर्गाला मा.विधानपरिषद आमदार.अमित गोरखे भारतीय संविधान व त्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.देशभरात अतिशय उत्साहाने साजरा होत असलेला संविधान गौरव अभियान अतिशय उत्साहाने पार पडला.कायद्याद्वारे निर्धारित सर्वांना समान हक्क देणारी एक चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.व आपणाला मिळणारे मूलभूत हक्क जे संविधान देते,धर्म,जाती, प्रांत,भाषा द्वेष सारे संपूदे एकनिष्ठा एकआशा एकरंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदने माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ही शिकवण देणाऱ्या संविधानाचा आपण आदर केला पाहिजे व देशाप्रती एक देशाचा नागरिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भारत देशाकडे प्रगतीने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगरसेवक संजय कणसे तसेच कार्यक्रमाचे संयोजिका जनसेवक सौ.दिपालीताई कणसे होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मोरे यांनी केले.आभार प्रदर्शन जनता शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच संयोजकाच्या वतीने महेश गायकवाड यांनी पाहुण्यांचे आभार मानले. उपस्थित अक्षय गायकवाड, विशाल केदारी, कपिल खरात, मंगेश मोरे, योगीराज कणसे, नंदा पाटील, हेमा क्षीरसागर, रुपाली डोंगरे संविधान प्रस्तावनेचे विदयार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग व उपस्थित मान्यवरांनकडून वाचन करून सांगता करण्यात आली.



















