सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.१२.२०.
खंडाळा- लोणंद येथील पोलिस ठाणे यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना दोन तासांत मुद्देमालासह अटक करून धडाकेबाज कामगिरी केलेली आहे.या कामगिरी बद्दल लोणंद पोलीस ठाण्याचे कौतुक केले जाते आहे. बुधवार (दि.१६ डिसें)ला लोणंद पोलीसात तक्रार दिली की मोटार सायकलवरून नीरा ते लोणंद रोडने लोणंद बाजूकडे येत असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या पल्सर मोटार सायकल वरील तीन इसमानी सदर गाडीवरून खाली ढकलून देऊन फिर्यादीकडील मोबाईल व पैशाचे पाकीट हे जबरदस्तीने जबरी चोरी करून लोणंद बाजूकडे पळून गेले आहेत.अशी माहिती मिळताच सदर घटनेचे गंभीर्य ओळखुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सदर ठिकाणची माहिती घेऊन आरोपींची माहिती घेण्याबाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या. त्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घडलेल्या ठिकाणाहुन संशयित आरोपींची माहिती घेऊन व गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा घडल्यापासून दोन तासात आरोपींचा पाठलाग करून गुन्ह्यातील पल्सर मोटार सायकल वरील तीन आरोपींना चोरीस गेलेल्या मालासह ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यातील आरोपी हे पोलिस रेकोर्डवरील गुन्हेगार आहेत.



















