चंद्रपूर : (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क: प्रतीक नळे ) वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक विशेष उत्साहाचा दिवस असतो. दिवस उजाडला की नविन कपडे घालून थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने दिवस न्हाउन निघत असतो.मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांच्या शुभेच्छा, भेटवस्तुं जास्त मोलाच्या वाटतात. परंतु जागृत युवा मंचने चंद्रपूर येथील किलबिल अनाथ आश्रमच्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच निमित्याने अनाथ मुलांना,कपडे, स्वेटर, ब्लँकेट, दूध डब्बे वाटप करण्यात आले. किलबिल येथे तीन महिन्याच्या बाळापासून बारा वर्षा पर्यंतची मुलं आहेत. कुणी रेल्वे स्टेशन वर सापडलं तर कुणी कचऱ्याच्या धिकार्यावर, परंतु समाजाने नाकारलेल्या ह्या निष्पाप मुलांबरोबर जागृत युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर ज्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या गालावर हास्य फुळविण्याचा प्रयत्न केला आहेे. किलबिल येथे भेट देऊन एक वेगळा अनुभव आला असून ह्यापुढे जागृत युवा मंचच्या वतीने प्रत्येकाचं वाढदिवस सामाजिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला. याप्रसंगी सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार, युवा विकास संस्थेचे रुपेश गावंडे , सारिका भगत, सुजाता रामटेके, उज्वला निरंजने, वैशाली वाढई, किनारा खोब्रागडे,गिरिधर दलाईत, शुभम दुर्गे, शिवानी विश्वास, रागिणी उईके आदी सदस्य उपस्थित होते.



















