जामखेड मध्ये गोळीबार, सात राऊंड फायर, गोळीबारात सागर मोहळकर गंभीर जखमी..
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. ५.०३.२६
जामखेड – अ.नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये कुख्यात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर (४ मार्च) भरवस्तीत गोळीबार करण्यात आला यात तो गंभीर जखमी आहे. न्युरानी कॉलनी भागात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर ७ राऊंड फायर केले, ज्यापैकी ४ गोळ्या त्याच्या अंगात घुसल्याने सागर गंभीर जखमी झाला आहे. तो कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत आला होता.
जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे बुधवारी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. सागर नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता अनेक गुन्हे असलेला सागर मोहळकर असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी आसायचा जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती.
या गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी ताबडतोब त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले नंतर शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलविण्यात आले .
भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळ व पैलवान सागर मोहोळकर विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैलवान सागरने कुस्तीच्या मैदानात निलेशच्या श्रीमुखात चापट मारली होती त्यानंतर पैलवान याला घायवळ याच्या समर्थकांनी मारहाण केली, या दोघांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकारणी गुन्हा नोंद केला होता. या गोळीबाराच्या घटनेनेने शहरात भीतीचे वातावरण असून रहिवाशी भीतीच्या छायेत वावरताना दिसत आहेत.



















