(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – जुबेर शेख)
पिंपरी-चिंचवड: विजयनगर परिसरात वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. मा.नगरसेविका सौ. नीता विलास पाडाळे (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) यांच्या अथक प्रयत्नांमुळे आजपासून या समस्येचे निवारण होण्याच्या दिशेने काम सुरु झाले आहे.
200 मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु दि. 8 जानेवारी 2025 रोजी, बीआरटी रोड ते बालाजी लॉन्स (सत्संग रोड) या मार्गावरून विजय नगर भागातील विविध सोसायट्यांना पाणीपुरवठा सुलभ करण्यासाठी 200 मिमी व्यासाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम प्रारंभ करण्यात आले. या कामामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सततची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.
नगरसेविकेची प्रतिक्रिया मा.नगरसेविका नीता पाडाळे यांनी सांगितले की, “या परिसरातील नागरिकांच्या मागण्या आणि तक्रारींना प्राधान्य देत आम्ही हा प्रकल्प राबवला आहे. हे काम वेळेत पूर्ण करून नागरिकांना जलपुरवठा सुरळीत मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
नागरिकांचा प्रतिसाद विजयनगरमधील रहिवाशांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी मा.नगरसेविका पाडाळे यांचे आभार मानले असून, या प्रकल्पामुळे परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.