नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.१४.१२.१९
येवला- जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक यांच्या नेतृत्वखाली शिक्षणी सहकार्य करून मुलांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले. मुलांना पुस्तकाबाहेरील ज्ञान आज गरजेचे आहे या उद्देशाने सुरू केलेली परंपरा आज पर्यंत चालत आलेली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवी च्या मुलांनी उत्साहात स्टॉल डे साजरा केला. त्यात विविध प्रकारची पदार्थ शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व गावातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांकडून पदार्थ विकत घेऊन मुलांचा आनंद द्विगुणि केला. मुलांना पुस्तक बाहेरील व्यवहारी ज्ञान होणे देखील गरजेचे आहे त्यामुळे सालाबाधा प्रमाणे ह्याही वर्षी चिमुकल्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जमा करून आपल्या पद्धतीने नियोजन करून विकताना त्यांचा आनंद आज वाढलेला आढळतो. गावातील लोक मुलांच्या आनंदात सहभागी होऊन मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून मोठ्या स्वरूपात मुलांची विक्री झालेली दिसून येते. या वेळी शाळेतील मुख्याध्यापक व गावातील सरपंच सौ. मंगला वरुळे, व पोलिस पाटील श्री.राजेंद्र पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



















