नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.१३.१०.१९
येवला- मुंबईतील शिव वडापाव हा १५ रुपयाला मिळतो मग तेच आता १० रुपयात जेवणाची थाळी कसे देणार असा सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. आज राजापूर येथे आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अंबादास बनकर, प्रमोद पाटील, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,संजय सोमासे, ज्ञानेश्वर दराडे, अरुण थोरात, शिवाजी भालेराव, संपत वाघ आदी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवल्यात मुंबईवरून आलेलं पार्सल मुंबईला परत पाठवू नका म्हणजे ते येवल्यातच ठेवा असे सांगितले आहे त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी याचा विचार करावा असे असा चिमटा त्यांनी काढला. ते म्हणाले की, ज्यांनी दहा रुपयात जेवणाची थाळी देऊ असे सांगितले त्यांचा मुंबईतील शिव वडापाव हा पंधरा रुपयाला मिळतो. त्यामुळे हे दहा रुपयात जेवणाची थाळी कशी देणार अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्प आपण पूर्ण केला असून या पाण्यावर सगळ्यांचा हक्क असून मतदारसंघातील सर्वच नागरिकांपर्यंत हे पाणी पोहचविले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ते राजापुरला देखील येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज प्रणालीतून शेतकऱ्यांची फसवणूक कारण्याचे काम केले आहे. त्यामुळे जेव्हा भाजप शिवसेनेचे हे लोक मत मागायला येतील तेव्हा या भाजप शिवसेनेच्या उमेदवारांकडे कागदपत्रे मागून आम्ही ते पडताळून मतं देऊ असे सांगा असे सांगत सरकारला चिमटा काढला. ते म्हणाले की, सद्याच्या सरकारकडून बहुजन समाजातील लोकांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यंदा आघाड्यात भाजप सेनेच्या पाहिलवानाना चारी मुंड्या चित करू अशी टीका करत विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. यावेळी अंबादास बनकर म्हणाले की, ज्यांनी २००४ साली येवल्याचा विकासाठी भुजबळांना मतदारसंघात आणले आणि आता मतदारसंघाचा न भूतो न भविष्यती विकास झाला असतांना भूमीपुत्राचा मुद्दा पुढे काढून विरोधाची भूमिका घेत असल्याचे सांगून केवळ आमदार होण्याच्या हट्टापायी सर्व भूमीपत्रांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की यंदाची निवडणूक, आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असून गटतट बाजूला सारून एकत्रित येत येवल्याच्या विकासासाठी छगन भुजबळ यांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजी भालेराव, विठ्ठलराव मुंडे, संपत वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे निष्ठावंत नेते विठ्ठलराव मुंडे, गोरखनाथ कुटे यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्प आपण पूर्ण केला असून या पाण्यावर सगळ्यांचा हक्क असून मतदारसंघातील सर्वच नागरिकांपर्यंत हे पाणी पोहचविले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ते राजापुरला देखील येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज प्रणालीतून शेतकऱ्यांची फसवणूक कारण्याचे काम केले आहे. त्यामुळे जेव्हा भाजप शिवसेनेचे हे लोक मत मागायला येतील तेव्हा या भाजप शिवसेनेच्या उमेदवारांकडे कागदपत्रे मागून आम्ही ते पडताळून मतं देऊ असे सांगा असे सांगत सरकारला चिमटा काढला.
ते म्हणाले की, सद्याच्या सरकारकडून बहुजन समाजातील लोकांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यंदा आघाड्यात भाजप सेनेच्या पाहिलवानाना चारी मुंड्या चित करू अशी टीका करत विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
यावेळी अंबादास बनकर म्हणाले की, ज्यांनी २००४ साली येवल्याचा विकासाठी भुजबळांना मतदारसंघात आणले आणि आता मतदारसंघाचा न भूतो न भविष्यती विकास झाला असतांना भूमीपुत्राचा मुद्दा पुढे काढून विरोधाची भूमिका घेत असल्याचे सांगून केवळ आमदार होण्याच्या हट्टापायी सर्व भूमीपत्रांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की यंदाची निवडणूक, आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असून गटतट बाजूला सारून एकत्रित येत येवल्याच्या विकासासाठी छगन भुजबळ यांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवाजी भालेराव, विठ्ठलराव मुंडे, संपत वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे निष्ठावंत नेते विठ्ठलराव मुंडे, गोरखनाथ कुटे यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.



















