उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१६.०१.२०२०
उस्मानाबाद- ११ जानेवारी रोजी धाराशिव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असताना अचानक ४ वाजताच्या दरम्यान मुख्य रंगमंचावर गोंधळ सुरू झाला. तिथे उभे असलेले झी २४ तासचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा हे वार्तांकनच्या हेतूने मोबाईलने सदरील घटनेची शूटिंग घेत होते. मात्र तिथे उभे असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी गवळी यांनी त्यांना शूटिंग काढण्यास मज्जाव केला.
मिर्झा यांना पत्र्यावर ढकलून देत अरेरावीची भाषा वापरली. एकूणच पोलिसांकडून झालेला हा प्रकार निंदनीय आणि निषेधार्थ आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची ही मुस्कटदाबी आहे. तरी हेड कॉन्स्टेबल शिवाजी गवळी आणि पोलीस उपनिरीक्षक दिनेश जाधव यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणी करीता कळंब तालुका पत्रकार संघ व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, अशोक शिंदे, दिलीप गंभीरे, शितलकुमार घोंगडे, बालाजी आडसुळ, मंगेश यादव, विलास मुळीक, परमेश्वर पालकर, रमेश अंबिरकर, बालाजी सुरवसे, अमर चोंदे, माधवसिंग राजपूत, सुभाष घोडके, सुधाकर सावळे, सुनील देशमुख, परवेज मुल्ला, राजे सावंत, कॉग्रेस चे जेष्ठ नेते भागवतराव धस, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तारेख मिर्झा, अॅड. आनंद चोंदे, अॅड. शकुंतला फाटक, अविनाश खापे, महादेव महाराज आडसूळ, माजी नगरसेवक शिवाजी कराळे, आकीब पटेल, सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष हर्षद अंबुरे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आष्टेकर, विकास कदम, संजय भांडे, माया शिंदे, अॅड. मनोज चोंदे, बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.



















