निर्भिड पत्रकार
पाटण प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटण तालुका टायगर ग्रुप मल्हारपेठ विभागाच्या वतीने बूधवार दि २० जून२०१८ रोजी मल्हारपेठ तालुका पाटण येथे मल्हारपेठ विभागातील १८ विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या प्रथम तीन गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यशस्वी विद्याधीँना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देवून गौरवणयात आले. टायगर ग्रुप मल्हारपेठविभागाचे अध्यक्ष पै सूरज पाटील याच्या वतीने या काय॔क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मल्हारपेठ विभागातील १८ विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत उत्तिर्ण झालेल्या प्रथम तीन गूणवंत विद्यार्थीना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरवणयात आले. या कार्यक्रमाला सातारा जिल्हा टायगर ग्रुप चे अध्यक्ष मा.सागर दादा शिंदे, कराड तालुका अध्यक्ष मा.शशीभाऊ, पूणे टायगर ग्रुप अध्यक्ष मा.सुमितदादा देशमुख, समाजसेवक, मा.श्री गोरखभाऊ नारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास टायगर ग्रुप पाटण तालुका अध्यक्ष शंकरभाई सांळूखे, किशोरभाई भांदिरगे,पै योगेश माने,बंपी भाऊ,सिद्धेश भांडूगळे,आदित गूरव,अक्षय कोळेकर , विजय लोहार,किरण सावंत, प्रदिप सावंत, इरफानभाई याच्या सह संबंधित विद्यालयातील मुख्यध्यापक शिक्षक वर्ग तसेच टायगर ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या अभिनव सामाजिक ऊपक्रमा बद्दल विद्यार्थी,शिक्षक, पालक व जनतेने टायगरग्रुपचे कौतुक केलेआहे.



















