डेअरी फॉर्म उड्डाणपूल लवकरात लवकर चालू होणार..!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि,०१.०२.२०२६
पिंपरी – शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी महापालिकेने पिंपरी डेरी फॉर्म येथे उड्डाण पूल बांधण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे या उड्डाणपुलाचे सबस्ट्रक्चरचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरीत ३० टक्के काम हे रेल्वे विभागाशी सलग्न आहे रस्त्याचे काम ६० टक्के झाले असून उड्डाणपून व रस्त्याचे उर्वरीत काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे हा प्रकल्प देखील जुनाच आहे डेरी फॉर्म येथील लोहमार्गावर पूल उभारल्या मुळे वाहतुकीसाठी रेल्वे सिग्नलवर थांबण्याची गरज राहणार नाही, या मुळे नोकरी, व्यवसाय, किंवा अन्य कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे हा पूल खुला झाल्या नंतर पिंपरीतील डेरी फॉर्म, पिंपळे सौदागर, राहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी, गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या पुलामुळे पिंपरी चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल पुणे मुंबई रस्त्याकडून पिंपरी गावात जाण्यासाठी अस्तित्वात असणारे मुंबई, पुणे, रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद होणार असल्याने नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल. पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी गावातील नागरिकांना पुणे मुंबई रस्त्याला पोहचण्यासाठी जवळचा पर्याय उपलब्ध होईल शगुन चौक मार्गे इंदिरा गांधी पुलावरून पुणे मुंबई रस्त्याला जाणाऱ्या वाहनाची वर्दळ कमी होईल संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी गावातील लवकरात लवकर पोहचण्याचा पर्याय उपलब्ध होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



















