नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.१४.१०.१९
येवला- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी येवला मुक्तिभूमी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यापक स्वरूपाचे असून, त्यांचे विचार जगाला तारू शकतात. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोचविण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त मुक्तिभूमीवर भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्री.भुजबळ यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ एकतावादी पक्षाचे नेते नानासाहेब ईदिसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मायावती पगारे, माजी सभापती प्रकाश वाघ, भागीनाथ पगारे , सुभाष गांगुर्डे, वसंत पवार आदी उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले धर्मांतर दिन म्हणजेच मानवमुक्ती दिन ऐतिहासिक आहे. एकही रक्ताचा थेंब न सांडवता कोट्यवधी लोकांचे धर्मांतर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन हा इतिहास घडविला. जगात अनेकांनी हिंसेच्या माध्यमातून धर्मांतर केले. मात्र , जगात केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी लोकांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने धर्मांतर केले. त्यामुळे जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व येवला मुक्तिभूमी यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ते म्हणाले २००४ ला मतदारसंघात आल्यानंतर या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्याचा निश्चय करून मोठे स्मारक उभे करण्याचे भाग्य मला लाभले. धर्मांतर दिनानिमित्त डोके टेकवून अभिवादन केल्यानंतर ऊर्जा मिळते. त्यातून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजविण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधानाला धक्का कोणीही लावू शकणार नाही.येवला- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी येवला मुक्तिभूमी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यापक स्वरूपाचे असून, त्यांचे विचार जगाला तारू शकतात. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोचविण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त मुक्तिभूमीवर भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्री.भुजबळ यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ एकतावादी पक्षाचे नेते नानासाहेब ईदिसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मायावती पगारे, माजी सभापती प्रकाश वाघ, भागीनाथ पगारे , सुभाष गांगुर्डे, वसंत पवार आदी उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले धर्मांतर दिन म्हणजेच मानवमुक्ती दिन ऐतिहासिक आहे. एकही रक्ताचा थेंब न सांडवता कोट्यवधी लोकांचे धर्मांतर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन हा इतिहास घडविला. जगात अनेकांनी हिंसेच्या माध्यमातून धर्मांतर केले. मात्र , जगात केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी लोकांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने धर्मांतर केले. त्यामुळे जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व येवला मुक्तिभूमी यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ते म्हणाले २००४ ला मतदारसंघात आल्यानंतर या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्याचा निश्चय करून मोठे स्मारक उभे करण्याचे भाग्य मला लाभले. धर्मांतर दिनानिमित्त डोके टेकवून अभिवादन केल्यानंतर ऊर्जा मिळते. त्यातून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजविण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधानाला धक्का कोणीही लावू शकणार नाही.



















