सांगली जिल्हा प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच तळागाळात आणि जातीच्या जोखंडात बांधल्या गेलेल्या बहुजनांना जगण्यासाठी दिशा मिळाली अन्यथा भारतातील बहुसंख्य बहुजन समाज आज मनुवादी विचाराने नष्ट झाला असता असे एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील हे बुध्द आणि आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले.नुकतेच एकुंडी येथील पंचशील नगरमध्ये तथागत बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जत नगर पालिकेचे बांधकाम सभापती भुपेंद्र कांबळे हे उपस्थित होते.यावेळी बोलताना सभापती कांबळे म्हणाले की, आज घडीला बाबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे.बाबासाहेब आंबेडकर व बसवेश्वर यांचे विचार एकच असून अशा थोर महामानवांमुळेच लोकशाही सदृढ आहे.यावेळी बौध्द समाजासह एकुंडी गावातील सर्व समाज एकत्र उपस्थित होते.



















