नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०७.२०२०
नाशिक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड, पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा महाराष्ट्रभर उद्रेक होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृहावर हल्ला करण्या मागे काहीतरी कटकारस्थान आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशा मागणीचे निवेदन येवला पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना देण्यात आले. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामध्ये आरोपी दिसत आहे. हा महाराष्ट्र पेटविण्याचा नियोजित डाव असून पोलीसांनी तात्काळ आरोपींना जेरबंद करण्याची मागणी संपुर्ण आंबेडकरी समुहाने केली आहे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यावेळी भारिपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, आर पी आयचे युवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, स्वारीपचे महेंद्र पगारे, संजय पगारे, नगरसेवक अमजद शेख, हमजा मन्सुरी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



















