सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०४.२०२०
पाटण- जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मिळणाऱ्या दारूचे दर अवाच्या सव्वा आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दारू पिणे परवडत नसल्याने अनेकांनी दारूचे व्यसन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तळीराम’ आता चांगलेच ताळ्यावर आल्याने हजारो कुटुंब यासाठी लोक डाऊन इष्टापत्ती ठरू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लोकडाउन मुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक जण घरीच आहेत. सुरुवातीचे चार-पाच दिवस दारूचा स्ट्रोक असल्याने ते अनेकांनी मजेत घालवले. मात्र आता दारू संपलेली अस्वस्थ वाटत असल्याने काही जणांनी सांगितले. छुप्या पद्धतीने मिळणाऱ्या दारूचे दर परवडत नसल्याने अनेक जण गपगार बसले आहेत.
लोक डाऊन मुळे अगदी शेतामध्ये काम करणारे मुजरा पासून ते करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकांपर्यंत अशा सर्वांनाच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तळीराम ह्या परिस्थितीला अपवाद नाहीत. जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी आधीचा दारूचा स्टॉक करून ठेवला आहे.मात्र ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना स्टॉक करून ठेवणे शक्य नव्हते.त्यामुळे एखादी तरी कॉटर मिळेल का, यासाठी तळीरामांची आता युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू झाली आहे. पाटण. मोरगिरी. ढेबेवाडी. उंब्रज. या ठिकाणी फिरून तळीराम दारू शोधताहेत. जिल्ह्यात खास करून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्ग आणि तरुण हे दारूच्या व्यसनात गुरफटत जात आहेत. मात्र आजकाल एकाच प्याला साठी आसुसलेल्या तळीरामांची अवस्था लोकडोवन बिकट बनले बनली आहे. छुप्या पद्धतीने काही ठिकाणी देशी दारू मिळत आहे पण तिथे दर दुप्पट-तिप्पट असल्याने दारू पिण्याचा परवडत नाही. त्यामुळे अनेक तळीराम दारूचे पैसे घरांमध्ये जीवनाश्यक वस्तू खरेदी मध्ये घालवताना दिसत आहेत.लॉकडाऊन अनेकांची वाटचाल आता विसरून तिच्या दिशेने सुरू झाले आहे दारूचे व्यसन आत घरात होणारे भांडण- तंटे कमी झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कुटुंबियांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.



















