पिपल फॉर अनिमल्स व बेळगाव वन विभाग दक्षता पथक यांच्या संयुक्तने स्टिंग ऑपेरेशन करून पाच आरोपीना रंगे हात पकडले
सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.११.२०२०
सांगली- चिकोडी व कोल्हापूर येथून घुबड विकण्यासाठी आलेल्या पाच आरोपीना सापळा रचून पकडण्यात आले आहे. चिकोडी, निपाणी, बेळगांव, कोल्हापूर या भागात मोठया प्रमाणात वन्य जीव तस्करी केली जाते. पिपल फॉर अनिमल्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोक लकडे यांना आपल्या विश्वनीय सूत्रांकडून घुबड विकण्यासाठी काही जण तयारीत आहेत अशी पक्की माहिती मिळाली. या बाबत वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ, दिल्ली विजिलन्सचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी बेळगाव फ़ॉरेस्ट दक्षता पथकचे जिल्हा उपवन संवरक्षक श्री शंकर कलोलीकर यांना माहिती देण्यात आली. पिपल फॉर अनिमल्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोक लकडे, श्री किरण नाईक, संस्तेचे कायदेशीर सल्लागार अँड बसवराज होसगौडर व बेळगाव दक्षता पथक मिळून एकत्रित नियोजन करून चिकोडी येते सापळा रचला. बनावट ग्राहक म्हणून अँड बसवराज होसगौडर व वनअधिकारी श्री सुरेश नाईक यांनी आरोपीना भेटले. हुमा घुबड असल्याचे खात्री झाल्यानंतर इशारा देताच मोठया शिताफीने दक्षता पथकने सर्व आरोपीना रंगे हात पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरज वडर, वय २०, रा.निपाणी,जि.बेळगांव , अरुण कोरवी, वय ३३, रा. सदलगा,जि.बेळगावी, संदीप कोरवी, वय २५, रा. सदलगा,जि.बेळगावी,शुभम कांबळे वय – २५, रा. कागल,जि.कोल्हापूर, मयूर कांबळे, वय – २२, रा.कडालगा, जि.बेळगावी. गुण्याकामी वापरण्यात आलेले तीन स्प्लेंडर मोटार गाडी MH ०९ डीसी ८५८१, केए २३ यू ३७४४, केए २३ ईडी ८३४५ व चार मोबाईल असे एकूण २ लाख रुपये मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. या स्टिंग ऑपरेशन बेळगाव जिल्हयाचे उपवन संवरक्षक शंकर कलोलीकर व दक्षता समिती यांच्या मार्गदर्शनखाली बेळगांव दक्षता पथकचे श्री वि.डी. हुद्दार, श्री बी. वि. उलनावर, श्री सुरेश नाईक, श्री राकेश मुरारी, श्री डि. आर. हंजी, श्री गिरीश बनाड, श्री सर्फराज जकती, श्री रवी व चिकोडी रेंजचे वनअधिकारी श्री विनय प्रधानी, श्री प्रभू तंगडी, श्री श्रीधर मुंडे, श्री दुर्गप्पा यांनी या कारवाई मध्ये सहभागी होते. आरोपी विरुद्ध वन्य जीव कायदा १९७२ अंतर्गत अटक करून चिकोडी न्यायालयत हजर केले असता ४ दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास चिकोडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री बसवराज उलन्नावर करत आहे.



















