सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिपक माने
दि.०२.०७.१९
पाटण- प्रगतशील विश्वाने दखल घेण्यालायक पाटण तालुक्याच्या विकासाची झेप ही तशी उत्तुंग अशी गरुड झेपच म्हणावी लागेल कारण याच पाटण तालुक्यातील कोयना धरण याच धरणाच्या पाण्यावर वीज निर्मित केंद्र याच विजेवर महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिकरणाची प्रगती याच पाटण तालुक्यातील पवन चक्यांमुळे तर पाटण तालुका म्हणजे पवन चक्यांची खानच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.त्याच प्रमाणे अगदी अलिकडील काळात पाटण तालुक्याचे सुपुत्र भारतीय वैमानिक संशोधक यांनी तर आपल्या राहत्या घराच्या टेरिस्वर विमानाची निर्मिती करुन आपल्या ग्रामीण असणाऱ्या पाटण तालुक्याला व आपल्या देशाला संशोधक जगतामध्ये एक आगळा वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. याशिवाय पाटण तालुक्याचा राजकीय आणि समाजिक इतिहास पाहता आपला पाटण तालुका अगदी शिव काल ते स्वतंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या प्रत्येक घडामोडीत राष्ट्र हितासाठी आपले प्रतिनिधीत्व करीत असल्याचे आजच्या काळापर्यंतचे अनेक दाखले देता येतील असे असूनही पाटणचे सुपुत्र विमान संशोधक माननीय अमोलजी यादव यांना जेंव्हा महाराष्ट्र शासनाने दिला शब्द अधांतरीत केला तेंव्हा तर किमान आपल्या पाटण तालुक्याच्या अस्मीयतेचा मुद्दा समजून तालुक्यातील दोनी नेत्यांपैकी किमान एकाने तरी शासनाला या बाबतीत जाब विचारायला हवा होता किंवा पाटण तालुक्यांने शासनाच्या निषेधात्मक आंदोलनांनी, मोर्च्यानी तर महाराष्ट्र शासनाला सळो की पळो करुन सोडायला हवे होते पण असे झाले नाही मात्र त्यांनी लावलेल्या शोधाचा मोठेपणा आम्ही गर्वाने सांगतो अशाच काही बाबतीतील नसून तोटा असून खोळंबा अशा सदरातील काही उदाहरने
किमान कागदी वास्तवता तरी मान्य करायला हवीच.या तालुक्याला अनेक बाबतीमधे शासकीय निमशासकीय नैसर्गिक, अनैसर्गिक विकास आणी आपत्तींनी ग्रासलेलं आहे.
◆ भुकंपग्रस्त- याचा दाखला देण्यात येतो परंतू त्याच कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेवू शकते परंतू त्याच कुटुंबातील इतर सदस्यांवर अन्याय होतो.शिवाय आता एकत्र कुटूंब पद्धतीच मुळात नष्ट झाल्यामुळे या नियमाला नष्ट करून तालुक्यातील कोणत्याही रहिवाशी नागरिकाला रहिवाशी दाखल्या प्रमाणे लाभ मिळावा असा नवा नियम आपल्या लोकप्रतिनिधींनी मंजुर करून घ्यावा.
◆ पुरग्रस्त- या बाबतीतली मदत म्हणजे ज्याचे नुकसान झाले आहे त्याची मदतीच्या नावाखाली शासनाने चालवलेली क्रुर थट्टा म्हणावी लागेल.
◆ धरणग्रस्त- या बाबतीत विचार केल्यास ज्या तालुक्यात वीजनिर्मिती केली जाते त्या तालुक्यात कसलीही रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील जनतेने किमान शेतीवर आपला उदर निर्वाह करावा याकरीता संपुर्ण तालुक्यातील सरसकट घरगुती आणी शेतीसाठीची वीज मोफतच मिळायला हवी यासाठी सुध्दा आमच्या लोकप्रतिनिधींनी यशस्वीरित्या विशेष प्रयत्न करायला हवेत.
◆ प्रकल्पग्रस्त- याबाबतीत तर तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की कष्ट करण्याची संधीच हिरावून घेतल्या गेली आहे.त्यामुळे असणारी शेती करता येत नाही.भीक मागायची नाही आणी उपाशी तर रहायच नाही. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे या आशेवर जर आपण जगत असलो तर ही फार मोठी घातक बाब ठरेल कारण हा नियम फक्त आणी फक्त नैसर्गिक घडामोडींसाठीच लागू आहे हे विसरून चालणार नाही.कोणत्याही मानवी बाबतीतल्या परिवर्तनाचे मुळ हे विचार परिवर्तनात आहे.आणी माणूसच विचार करू शकतो आणी आपण एक माणूसच आहोत आणी म्हणून आपण आपल्या वास्तवाचा विचार करावा येवढीच माफक अपेक्षा.
◆ पुनर्वसनग्रस्त- याबाबतीत तर विचार करता पुनर्वसनग्रस्त लोकांची शासनाने फसवणूक केली आहे की काय ? हे काही कळायला मार्ग नाही, असा इतक्या वर्षांच्या विलंबचा विचार करता हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही पण पुनर्वसन ग्रस्त लोकांनी जर शासनाला फसविले असते तर शासनाने त्यांना नोटिस काढून संबधीत लोकांवर फसवनूकीचे गुन्हे दाखल केले असते पण आत्ता पुनर्वसन ग्रस्त लोकांनीच शासनावर गुन्हे दाखल केले असते अशी वेळ असूनही लोकांमधे कमालीचा सय्यम आहे हे आजपर्यंतच्या आंदोलनांवरून दिसुन येते तर अशा सर्व ग्रस्त बाबींचा विचार केल्यास आम्हास आताच्या वर्तमानातून भविष्याचा विचार करता आपल्या तालुक्यासाठी काही मागण्या मागाव्या लागणार आहेत आणी त्या प्रत्येक मागणीमधे एक अट राखायलाच पाहिजे ती म्हणजे कोणत्याही जातीचा निकष न लावता बौध्दीक व आर्थिक उन्नतीच्या सर्व क्षेत्रांमधे त्या त्या क्षेत्रातील शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र असणाऱ्या दरेकाला सरसकट संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेरही संधी मिळायलाच हवी अशा स्वरूपाचा महाराष्ट्र राज्यात राज्यशासनाने पाटण तालुक्यासाठी हा सवलत कायदा आरक्षित करून घ्यायला आपल्या लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करायला हवेत. अशी सगळी आपल्या तालुक्याची अत्यंत दयनीय अवस्था असताना सुद्धा आपण कशाचाही विचारच करीत नाही हेच एक फार मोठ मानवी आश्चर्य म्हणावं लागेल.



















