मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२/२/१९
वरळी मुंबई येथील स्मशानभुमीत कोट्यवधी बहुजनांची माता रमाई यांचे सन २७ मे १९३५ साली अंतिम संस्कार झाले होते. तेव्हापासून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्यागमूर्ति रमाई यांच्यावर अंतिम संस्कार झालेल्या जागेवर जाऊन अभिवादन करत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशी असतांना रमाईने कशा प्रकारे संकटाला सामोरे जाऊन परिस्थितीवर मात केली.
रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी साथ देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. तो आदर्श यावेळी कवितेच्या माध्यमातून समोर यावा व रमाईच्या कार्याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून मुंबई मधील सामाजिक संस्था सोशल नेटवर्क आंबेडकराईट पिपल्स् (स्नॅप) संस्थेच्या वतीने रमाई आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंतीच्या निमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन १० फेब्रुवारी २०१९ रोजी वरळी रमाई आंबेडकर स्मशानभूमीच्या आवारात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री मनिषा मेश्राम होत्या, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी किरण सोनावणे, संस्थेच्या अध्यक्षा अंकिता गायकवाड, अमोल साळुंखे, ममता अढांगळे, वंदना गवई, डॉ. दिपक गायकवाड, अमोलकुमार बोधिराज, दिलीप पवार होते.
रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व वंदना घेऊन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यागमूर्ती रमाईना काव्यफुलांनी अभिवादन करण्याचा उपक्रम आम्ही प्रथमच राबिवला आहे. असे संस्थेच्या अध्यक्षा अंकिता गायकवाड यांनी प्रस्ताविकेतून बोलतांना सांगितले. माता रमाईने, डॉ. बाबासाहेबांना साथ देऊन आजच्या महिलांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे. सांस्कृतिक चळवळीतून आम्ही रमाईना अभिवादन, काव्य फुलांनी केले आहे. असे कवी संमेलन अध्यक्षा मनिषा मेश्राम यांनी बोलतांना सांगितले.यावेळी जेष्ठ कवी गायक, मास्टर राजरत्न राजगुरू, जेष्ठ कवी विलास बसवंत, विजयकुमार भोईर, जगदेव भटू, वसंत हिरे, सुनंदा कांबळे, सुरेखा गायकवाड, नवनाथ रणखांबे, अँड. प्रज्ञेश सोनावणे, कवी दिप, शाम भालेराव, मिलिंद जाधव, अशोक कांबळे, मारुती कांबळे, गोविंद मोरे, रेखा रोकडे, प्रतिभा सोनावणे, छाया कदम, वनिता खडसे, धम्मानंद खडसे, अशोक कदम, अनिता जगताप, वृषाली माने, पुजा सोनावणे, रमेश घरत, कुंदला मोरे, कामिनी धनगर, सुमेध धनगर दिक्षा साबळे, संतोष महाडिक दिपराज वर्धन, किशोर पवार, प्रमोद पवार, सुनिता साबळे, उमेश चव्हाण, धनंजय सरोदे, सुरेन्द्र अढांगळे, अशोक बोधी, अर्चना झोडपे, वृषाली माने या कवी/कवयित्रीनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर विविध स्वरचित दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या. सर्व कवींना यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थचे पदाधिकारी दिलीप पवार, मीना कदम, अंकिता गायकवाड़ प्रदीप कदम, मधुकर जानराव, विवेक शिर्के, श्वेता मोहीते, केतन मोहीते, सुमेद मोहीते, विश्वास मोहीते, अमित पवार, संजय अहिरे, संतोष पवार, अनिल जाधव, राम मोरे, संदीप कदम, आरेरत्न गायकवाड, यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन दिलीप पवार यांनी केले असून, आभार श्वेता मोहीते यांनी केले, तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मीना कदम यांनी केले.



















