पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अमर सुर्यवंशी
दि.३.१२.२०१९
पुणे- न्यू फलटण शुगर लि. साखरवाडी या कारखान्याचे २०१७-२०१८चे थकित ऊस बिल संदर्भात साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे मा.शेखर गायकवाड यांच्या दालना मधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. खासदार राजू शेट्टी साहेब आणि दत्त इंडिया कंपनीचे संचालक मा.धारु यांचे सोबत बैठक झाली. या बैठकीत थकित ऊस बिलापोटी १० कोटी रुपये देण्यास तयार होते परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी यांच्यावतीने मा.खासदार राजू शेट्टी साहेब आणि मा.शेखर गायकवाड साखर आयुक्त सर्व काही गोष्टी ऐकून घेऊन दत्त इंडिया शुगरचे मालक मा.धारु साहेब यांना सांगण्यात आले की संपूर्ण बिलाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. असे मा.खासदार साहेब यांनी सांगितले परंतु सर्व माहिती घेतल्यानंतर मा.धारु दत्त इंडिया शुगर चे मालक यांनी वीस कोटी बिलापोटी देण्यास तयार झाले परंतु राहिलेली उर्वरित रक्कम मा.धारु साहेब देण्यास तयार झाली परंतु त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की प्रक्रियेसाठी वेळ लागला परंतु काही दिवसातच आपण राहिलेली रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देऊ असा शब्द मा.धारु साहेब यांनी दिला परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी असल्याचं सांगितलं आणि अर्जासोबत आपण पुराव्यासाठी वजन काटा पावती किंवा ऊस बिल पावती ग्राह्य धरली जाणार आहे. या विषयावर सलग २ तास चर्चा झाल्यानंतर त्यांनी २ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी 20 कोटी देण्याचे मान्य केले, व , (एन सी एल टी) कडे ज्या ऊस दिलाचा क्लेम केला गेला नाही अशा शेतकऱ्यांचे सुद्धा (एन सी एल टी )चे फॉर्म भरून घेऊ आणि (एन सी एल टी) न्यायालयाकडे दाखल करू त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू व शेतकऱ्यांना न्याय देऊ असे कबूल केले आहे आणि यावरती असा तोडगा निघून बैठक संपली असे जाहीर करण्यात आले यावेळी बैठकीसाठी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा.धनंजय महामूलकर तालुकाध्यक्ष मा.नितीन यादव मा.प्रमोद गाडे फलटण शहर अध्यक्ष मा.सचिन खानविलकर जिल्हा सरचिटणीस मा.डॉ घाडगे मा.पंकज आटपाडकर. मा.उत्तमराव भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष मा.सुभाष जाधव.व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.



















