नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतीनिधी,
दि.२७.०४.२०२०
● मद्य नेणाऱ्या कारचा १९ पोलिस वाहनांनी केला सिनेस्टाइल पाठलाग, दोघे ताब्यात
गंगापूर- रविवारी सायंकाळची वेळ होती लाकडाऊन सुरू असल्याने नेहमीप्रमाणे शहरात नाकाबंदी सुरू होती एका इंडिका कारमध्ये दोघेजण मद्य घेऊन जात होते. पोलिसांच्या नजरेतून हे भामटे सुटले नाही. गंगापूर भागात पोलिसांनी ही कार थांबविण्याचा प्रयत्न केला पण कारचालक थांबेना यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरु केला. यांनतर गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, निर्भया पथक अशा साना ही बाब लागोपाठ कळवली गेली. या सर्व पोलिस ठाण्याच्या तब्बल १९ वाहनांनी या संशयितांचा सिनस्टाइल पाठलाग केला व अखेर संशयितांना जेरबंद केले. सिनेस्टाइल शहरातील रस्त्यावर चोर-पोलिसांचा हा थरार पाहून अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता . कोणत्याही घटनेत आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मग त्यासाठी पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून आरोपी पकडतातच, असाच थरार रविवारी सायंकाळी शहरातील रस्त्यावर दिसून आला. सुरवातीला ज्या नागरिकांनी हे दृश्य पाहिले त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. शहरात काही विपरीत घटना घडली का ? या संशयाने भीती निर्माण झाली होती. आधीच कोरोनामुळे नागरिक चिंताग्रस्त असताना त्यात पोलिस पाठलाग करत असल्याचे दृश्य दिसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती. गंगापूररोडला इंडिका कारमध्ये दोघे मद्याच्या बाटल्या घेऊन निघाले होते . यावेळी नाकाबंदीतील पोलिसांनी कारचालकाला थांबण्यास सांगितले. पण कारचालकाने न थांबता कारचा वेग वाढवला या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पाठलाग सुरु केला. ही कार सातपूर लिकरोड, अंबड अशा भागातून जात होती म्हणून गंगापूर पोलिसांनी सातपुरला व सातपूर पोलिसांनी अंबड पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी तत्काळ रस्त्याचा मागोवा घेत पाठलाग सुरु केला. हा पाठलाग होत असताना इंडिका कारचा चालक इतका वेगात होता कि त्याने चार-पाच ठिकाणी बॅरिकेड्टसला धडक दिली. कारचालक जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळत होता. लेखानगर, गोविंदनगर, मुबईनाका, उड्डाणपूल, शिवाजी चौक असे करत कारने पांगरे मळा गाठला. या रस्त्याने कारचालकाचा घात केला कारण येथे रस्ताच संपला होता. या पाठलागात एक नाही दोन नाही तर तब्बल १९ पोलिस वाहने पाठलाग करत होती आणि अनेक कर्मचारी व अधिकारी धावपळ करत होते. दोन बेजबाबदार नागरिकांमुळे पोलिसांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला. अखेर कार (एम एच ०४ बीएस ३८८१) सह सागर विलास जाधव वय २४,रा. भुजबळ फार्म व मोतीराम चिंतामण शेवरे वय २०, रा. शिवशक्ती चौक या दोन संशयितांना मद्याच्या बाटल्यांसह गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



















