पिंपरी (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०२.२०२०
निगडी- पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हात वाढ असुन गुन्हेगारी कमी करण्यात पिपंरी चिंचवड पोलिस प्रयत्न करीत आहेत. दि.२ फेब्रुवारी २० रोजी पहाटे ४ वा. सुमारास अाबेंडकर नगर थरमॅक्स चौक कुंदन हुंदाई शोरूममधून समोर चिंचवड येथे रोहित चंद्रकांत मुद्दे सह इतर पाच साथीदाराना हाणामारी करत कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत आदण्यात ठोळक्याने १६०० रु काढून घेत त्यांचा टेम्पो व परिसरातील लावलेली वाहने त्यामधे ४ मोटरसायकल, ६ थ्रीव्हीलर वाहनाचे तोडफोड करुन अंदाजे ४०,००० रु नुकसान करुन आरोपींनी पळ काढला होता या गुह्याच्या तपासाच्या अनुसंघाने तपास सुरु होता, त्या वेळेस पो.हवा. किशोर पढेर यांना गुप्त खबऱ्याकडून सदर गुन्ह्यातील आरोपी दुर्गानगर चौकातील सि.एन.जी पंपा समोर असल्याची माहिती मिळाली.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ यांनी गणेश जवदवाड वरिष्ठ पोलीस निरिक्षक निगडी पोलीस स्टेशन,पो.ना. ढोले, पो.ना.केकाण,पो.ना. मावसकर पो.शि. मिसाळ,पो.शि.बोडके, यांचे खास पथक तयार करुण मिळालेल्या माहिती प्रमाणे सापळा लावून राहुल रामचंद्र दौंड, वय ३० वर्षे, रा.बि. नं.११ रु.४ अजंठानगर चिंचवड़ पुणे व रोहित आश्रुबा आव्हाड. वय. २१ वर्षे रा.गती कंपनी समोर अजंठानगर चिंचवड या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन आनून चौकशी सुरू केली चौकशीत त्यांचे साथीदार रोहित चंद्रकांत मुद्दे, आकाश चंद्रकांत मुद्दे दोघेही रा.आंबेडकर नगर हुंदाई शोरूम समोर चिंचवड हरुण नशिर शेख रा.घरकुल चिखली असल्याचे सांगितले. रामचंद्र दौड व. रोहित आव्हाड यांना रात्री ११.३० पर्यंत अटक करण्यात आले व इतर आरोपी बाबत शोध सुरु असताना पो. ना. सतीष ढोले यांना माहिती मिळाली की रोहित मुद्दे हा सुभाष नगर बार्शी येथे आहे. त्यांची माहिती पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ यांना देताच त्यांच्या आदेशाने सोलापुर बार्शी जाण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे त्यांच्या सोबत पो.ह.पढेर, पो.ना. ढाले,पो.शि. सांळुखे असे खासगी वाहनाने जावून बार्शी पोलीस स्टेशनची मदत घेत आरोपींना २४ तासात अटक केली. हि कारवाई मा.संदीप बिष्णोई पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.श्री रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त मा.स्मिता पाटील पोलीस उप-आयुक्त परि-१, हे गुन्हा घडलेपासून प्रत्यक्ष हजर राहून वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करुन श्री.राम जाधव सहा.पोलीस आयुक्त पिपरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस स्टेशनचे श्री.गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन पुणे, श्री.राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक (गन्हे) पिंपरी पोलीस स्टेशन, सहा पोलीस निरीक्षक, श्री.एल.एन.सोनवणे, श्री.प्रशांत आरदवाड, पोलीस उपनिरीक्षक, श्री.पी.आर.लोखडे, श्री. के.बी.माकणे, सपोनि शंकर बांगर, पो.हवा.किशोर पढेर, पो.ना.सतिश ढोले, पो.ना.विलास केकाण, पो.ना.रमेश मावसकर, पो.ना.विनोद व्होनमाने, पो.ना.चंदकांत वाघमारे, पो.शि.अमोल साळूखे, पो.शि.भूपेद्र चौधरी, पो.शि.विजय बोडके, पो.शि.राहुल मिसाळ, पो.शि.तुषार गेंगले यांनी केली आहे.



















