सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.३.२०२०
सातारा- वाळू वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी अमोल देशमुख आणि त्याचा सहकारी अविनाश माने (रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, स्वराज नगर, गोडोली, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. तलाठी अमोल देशमुख शहापूर ग्रामपंचायतीचा तलाठी आहे. याबाबत मिळालेली माहिती आशी, की ३० वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुक करणाचा व्यवसाय आहे. वाळू वाहतूक करताना महसूल विभागाने त्यांचे वाहन पकडले होते. त्या वाहनावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरिता तसेच भविष्यात त्यांच्या वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे अमोल देशमुख आणि अविनाश माने यांनी १० हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची पडताळणी ९ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने वरील दोघांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अविनाश जगताप, पो.ह. संजय साळूंखे, भोसले, यांनी केली आहे.



















