पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.११.१९
दापोडी- धम्मचक्र परिवर्तन महाविहार दापोडी येथे संविधान सन्मान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी धम्मचारी संघभद्र (चेअरमन) यांनी मार्गदर्शन केले. संविधान मुळेच एकसंघ आहे अन्यथा जाती धर्माच्या नावाने देशाचे तुकडे पडले असते. एकसंघ भारताच्या निर्मिती बरोबर आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संविधानाचे महत्व त्यांनी विशद केले. संविधानाच्या केंद्रस्थानी व्यति आहे. व्यकतीचा विकास आणि प्रतिष्ठा जपण्याचे काम संविधान करत आहे. व्यतिविकासासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांची जोपासना घटनेने केलेली आहे. तत्वच नैसर्गिक जीवन जगण्याचे अधिकार दिलेले आहेत. शिक्षणाचा अधिकार, संपत्ती मिळवण्याचा अधिकार, रोजगार किंवा व्यवसाय करण्याचा अधिकार, प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार, शोषण करणाऱ्या विरुद्ध न्याय मागण्याचा अधिकार इ बाबींवर उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन सर्वाना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी स्पर्धा परीक्षा केंद्रातील ६५ विद्यार्थी हजर होते. तसेच धम्मरत्न, प्रसन्नरत्न, सिद्धीराजा ज्ञानराजा, शक्यमित्र, गगनभद्र, विशुध्दरत्न हे मान्यवर उपस्थित होते. सुरज कांबळे यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले तर प्रसन्नरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.



















