सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटण, तालुक्यातील नाडॊली हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून या गावच्या सभोवताली डोंगर रांगा आहेत याच डोंगरातील काही भाग तत्कालीन लोकांकडून स्टोन क्रेशरवाले यांनी खरेदी केला आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्टोन क्रेशर चा व्यवसाय सुरू केला आहे पण या गावच्या भोळ्या भाबड्या जनतेला काय माहीत की याचे काय दुष्परिणाम होणार आहेत.स्टोन क्रेशेर बंद व्हावे या मागणीचे निवेदन तहसीलदार मा.रामहरी भोसले, प्रांतअधिकारी मा.श्रीरंग तांबे तसेच पाटण पोलीस स्टेशन यांना नाडॊली गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले.या स्टोन क्रेशर वाल्यांनी पूर्ण डोंगर पोखरून काढला आहे.आज या डोंगरातून आपोआप दरडी कोसळत आहेत.एवढेच नव्हे तर स्टोन क्रेशरमुळे खालील प्रमाणे नुकसान होत आहे.
स्टोन क्रेशरमुळे पोखरलेल्या डोंगरांमुळे आपोआप दरडी कोसळणे, गावच्या सभोवताली स्टोन क्रेशर असल्याने त्याच्या धुळीने गावच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बोअरब्लास्ट मुळे घरांना गेलेले तडे परिणामी खिळखिळीत झलेलेली घरे.बेकायदा अतिक्रमण यामुळे गावाचे व शासनाचे नुकसान झाले आहे.गावातील जनावरांचा चारा या स्टोन क्रेशरमुळे बंद झाला.स्टोन क्रेशरमुळे होणारी धूळ ही चाऱ्यावर बसते त्यामुळे जनावरे चारा खात नाहीत.परीणामी जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.खडी वाहतुकीसाठी अवजड वाहनांमुळे खराब झालेला रस्ता व रस्त्याच्या धुळीने पिकांचे नुकसान झाले आहे.सर्वात महत्वाचे गावात पिण्याच्या पाण्याचे होत असलेले हाल.कारण बोअर ब्लास्टमुळे जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत बदलले आहेत.तसेच रात्री अपरात्री ब्लास्ट करत असलेने लहान मुले व रृदयविकार असलेल्या लोकांमधे भीतीचे वातावरण झाले आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील माळीन गावासारखी नाडॊली गावची अवस्था होऊ नए अशी मागणी निवेदनाद्वारे नाडॊली गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
नाडॊली गावातील ग्रामस्थांनी अनेकदा तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदन देवून सुद्धा खडी क्रेशर वाले काय आपला ठिय्या सोडण्यास तयार नाहीत, वरून ते बोलतायत आमचे वर पर्यंत हात आहेत.
🌑 गावकरी ग्रामस्थ
खडीक्रेशर वाल्यांचा अगोदरच मनमानी कारभार आणी त्यात त्यांची दंडील शाही चालू आहे.खडीक्रेशरमुळे होणाऱ्या धुळीमुळे शेतीचे नुकसान त्याच बरोबर गुरांना जो चारा लागतो त्यावर धूळ बसल्याने तो गवत चारा जनावरे खात नाहीत गावातील सर्वसामान्य माणूस हीतुणफुडे जनावरे बाळगणार नाहीत.त्यांना आम्ही आडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दंडील शाही करत सर्व सामन्यांना मारहाण सुद्धा केली.शासनाने खडीक्रेशरवाल्यांवर करोडो रुपए दंड केला परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई अध्याप झालेली नाही.जर शासनाने खडीक्रेशर बंद केल नाही तर आम्ही येणाऱ्या जानेवारी अखेर आत्मदहन करु.
🌑 नाडॊली सरपंच अरविंद किसन पवार
मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन लाखो रुपयांची रॉयल्टी व दंड यांच्यावर झालेला असून सुद्धा बेकायदेशीर रीत्या उत्खनन चालू आहे.हे उत्खनन बंद करावे अशी आमची शासनाला मागणी आहे.नाडॊली गावातील आम्ही सर्वजण एकत्र येऊन तहसीलदार, प्रांतअधिकारी, पोलीस स्टेशन पाटण यांना निवेदन दिले.शासनाने दखल घेऊन नाडॊली गावच माळीन न होता एक सुसंस्कृत आणी चांगल गाव होण्यासाठी शासनाने दखल घेऊन सर्व खडीक्रेशर बंद करावे आणी गावाला त्यातून कायमस्वरूपी खडीक्रेशर मुक्त कराव.



















