निर्भिड पत्रकार
प्रतिनिधी, पाडूरंग लोहार
दिनांक-१९/०६/२०१८
नाडेगावापासून ३ किलो मीटर अंतरावर असणारे नाडोलीचा रस्त्याची दूरावसथा पाहून असे वाटते रस्ता कोमात स्टोन केॅशर जोमात.
नाडोली गांव नवारस्ता शहरापासून अवघ्या तीन किलो मीटर अंतरावर आहे या गावच्या हद्दीत जवळजवळ सहा दगडांच्या खाणी आहेत
गेल्या अनेक वषापासून या दगडांच्या खाणी असून खाणीतून मिळणारे मटेरियलची वाहतूक करण्याकरता नाडोलीचा रस्त्यावर सतत अवजडवाहनांची वाहतूक सूरू असते. या अवजड वाहनाची वाहतूकीने रस्ता पूर्ण खराब झाला असून या खराब रस्ता यामुळे इतर खाजगी वाहनधारकाची मनमानी टिकिट दर यामूळे नाडोलीचे लोक वैतागून गेले आहेत. पाटणचे आमदार शभूराजे देसाई यानी २००४ साली या रस्त्यावर डाबरीकरण केलेल्या या रस्ता अवजड वाहनांची वाहतूक असल्याने खराब झाला आहे. गेले अनेक वर्षापासून चालू असणार्या खाणी यामुळे खाण मालक झाला मालामाल पण रस्ताच झाले हाल आता याच खराब रस्ता वर पाणी मारून चालणारी अवजड वाहने यामुळे गावच्या लोकांना जीव मूठीत घेऊन जावे लागते त्यातच् वाहनधारकाची मनमानी यामुळे शाळेत जाणारी मूले घरी येताना व जाताना खूप अडचण होते मूले घरी येत नाहीत तोपर्यंत पालक चितेत असतात आणखीन याच ठिकाणी एल् एन टी सारखी मोठी कंपनी आली महणजे अडचणीत वाढ गावकरी वैतागून गेले आहेत. या खाणी साठी नाहरकतदाखले कोणी दिले रस्ता कोणी खराब केला या विषयावर शासनाने विचार करावा एकतर दगड खाण वाले नाहीतर एल् एन टी कंपनी किंवा तालुका आमदार यापैकी कोणीही नाडोलीचा रस्ता करावा एवढीच माफक अपेक्षा खाणीमूळ गावाला होणारा त्रास या कडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर एक दिवस नाडोलीचे मालीण गाव झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.



















