चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी
(दिनांक ३/९/२०१८)
चिमूर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सण २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षांमध्ये चिमूर तालुक्यातील पळसगाव व जांभुळघाट या दोन शाळेमध्ये नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली,या केंद्राची प्रत्यक्ष लाभ हा वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थाना व परिसरातील शाळा ना होईल,या केंद्रामध्ये ५२० प्रकारचे विज्ञानाचे साहित्य महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदे कडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या शाळेची पटसंख्या सर्वाधिक आहे व विद्युत पुरवठा व अतिरिक्त वर्ग खोली आहे, आशा शाळेची निवड करन्यात आली असून त्या शाळेतील विज्ञान शिक्षकाकडे या विज्ञान केद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या अत्याधुनिक नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्रामध्ये खेड्यापाड्यातील विद्यार्थाना विज्ञान संशोधनाचे धडे मीळत आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळन्यासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे.२५ विज्ञान साहित्य २५ अंतराळ संशोधनाचे साहित्य,२५ गणित साहित्य ५९ अभ्यास कर्मावर आधारित व इतर प्रकारचे १० साहित्य सदर केंद्रावर ५२० प्रकारचे साहित्य केंद्रावर उपलब्ध आहेत,शौक्षणनिक सत्र पासून या केंद्राचा उपयोग करीत आहेत.
सदर नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्रास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या एक पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे, या विज्ञान केंद्राचा उपयोग विद्यार्थी योग्य प्रकारे घेत आज की नाही,परिषदेने पुरविलेल साहित्य मिळाले की नाही,भविष्यात विज्ञान केंद्र कसे उपयुक्त होईल या साठी पळसगाव व जांभूळघाट या केंद्राची तपासणी केली आहे,या पथकामध्ये डायटचे अधिवाखात्या हे पथकात असून ,कार्यक्रम अधिकारी,शाळा मान्य प्रयोगशाळा प्रतिनिधी,आत्राम सर brc चिमूर,सदर पथकांनी भेट दिली असता मा.कामडी सर मुख्याध्यापक,स,शी,विज्ञान शिक्षिका ठवरे मॅडम,गुळधे सर,धारणे सर,केंद्रे सर,मेंढुलकर मॅडम,पेंदोर मॅडम,विकास खोब्रागडे संगणक परिचालक,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती,



















