सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिपक माने
दि.२२.०९.१९
पाटण- दरवेळेच्या कोणत्याही निवडणुकीत पाटण तालुक्यात अनेक नवनवीन पक्ष आणी त्यां पक्षाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात परंतू एकाचाही विचार जनतेने केलेला नाही.पाटण तालुका हा भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त,प्रकल्पग्रस्त,पूरग्रस्त,बेरोजगारग्रस्त अशा अनेक बाबींनी ग्रस्त असूनही तालुक्यामधे दोन प्रबळ गट असताना तिसरा पर्याय अजुनतरी तालुक्यातील जनतेला मान्यच नसल्याचे आजवरच्या घडामोडीतून दिसत आहे किंवा असेही म्हणता येईल कीं जे जे इतर काही पक्ष आपापल्या पक्षाचे उमेदवार उभे करत असतात एक तर ते पक्षच लोकांना नकोसे वाटतं असावेत किंवा त्यां पक्षाचे उमेदवार तालुक्यातील जनतेला विधानसभेच्या आमदारकीच्या पात्रतेचे वाटतं नसावेत किंवा त्या पक्षाचा उमेदवार अथवा त्यां पक्षाचे कार्यकर्ते तालुक्यातील मतदारांवर आपापल्या पक्षाचा प्रभाव पाडण्यास कमी पडत असावेत आणी जर असे काही नसेल तर विद्यमान दोन गटांनी किंवा दोन पैकी एका तरी गटाने तालुक्यातील मतदाराच्या धार्मिक,मानसिक,आर्थिक आणी सामाजिक परिस्थितीचा गैर फायदा घेवून त्यांना राजकीय मानसिक गुलाम बनवण्यात नक्कीच यश मिळवले आहे.कारण तालुक्याची प्रगतशील स्थिती लक्षात घेता तालुक्यातील अनेक गावांचा विकास बऱ्यापैकी झाला असून त्यां गावातील ग्रामस्त बाकी बेरोजगारीने ग्रासलेला आर्थिक दूर्भलता प्राप्त झाल्यामुळे मनोमन खचून गेलेला असा असतानाही यावर मात करण्यासाठी तिसरा पर्याय निवडत नाही हेच खरे राजकीय गौड बंगाल आहे असे म्हंटल्यास वावगे वाटू नये.आणी म्हणून नाईलाजाने आशा उमेदवारांच्या बाबतीत खेदाने असे म्हणावे लागते की “निवडणुकीच वार सुरू झाल्यासारखं वाटतंय, नाव घोशीत होताच मला आमदार झाल्यासारखं वाटतंय.”
परंतु पाटण विधानसभा मतदार संघाचे सत्तेसाठी दावेदार दोनच गट प्रभळ मानले जातात या संघर्षामधे पाटणकर आणी देसाई गट अशिच लढत पहावयास मिळते यंदाही पाहण्यास मिळणार आहे मात्र या दोनी राजकीय विरोधकांचा विचार करता विधानसभा सदस्य मा.शंभूराज देसाई साहेब यांनी विधानसभा सदस्याची संधी मिळताच उत्कृष्ट संसद पट्टू हा बहुमान संसदेत पटकावून पाटण तालुक्याला संसदेमधे सन्मानित केले तर या पंचवार्षिक कार्यकाळामधे तालुक्यातील विकास कामांना प्रथम प्राधान्य देवून अनेक कामे मार्गी लावून विकासात्मक यशस्वी वाटचाल केल्याचे जाणवते परंतू प्रत्येकी निवडणुकीदरम्यान यश पदरात पाडून घ्याव लागतंय अर्थात अतिशय प्रयत्न करावे लागत आहेत कारण अंतर्गत छुप्या गट बाजीचा विचार केल्यास गत काळातील निवडणुकीदरम्यान काही ठिकाणच्या आणी ठळक पणे मल्हारपेठ गणातील घडामोडींवरून असे लक्षात येते कीं देसाई गटाकडे सुद्धा शिवसेनेचे कट्टर मतदार काही प्रमाणात का होईना आपले अस्तित्व सिद्ध करण्या इतपत प्रामाणिक मतदारांचा एक पक्षनिष्ठ गट आहे आणी त्याही पेक्षा जास्त प्रमाणात व्यक्तिनिष्ठ (देसाई गट) म्हणून मत देणारा एक मतदार गट आहे या अंतर्गत असणाऱ्या दोन गटांमधे पक्षनिष्ठ कीं व्यक्तिनिष्ठ ? यापैकी एका भुमीकेवर नक्कीच यावे लागेल किंवा या दोन गटांचे मनोमिलन घडवून कोणती तरी एक भूमिका स्वीकारल्यास जे यश पदरात पाडून घ्याव लागत आहे तेच यश आपल्या मागे लागत आल्याशिवाय राहणार नाही.अशा अनेक बाबींचा विचार करता आणी सध्या त्यांचा प्रतिस्पर्धी आणी राष्ट्रवादी पक्षाची सद्यस्थिती पाहता यंदाही २०१४ चीच पुनरावृत्ती होवून मा.शंभूराज देसाई साहेबच पुन्हा विधानसभा सदस्य होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मा.सत्यजितसिंह पाटणकर यांचा पाटण तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांवरील प्रभाव पाहता राष्ट्रवादीचे काही दिग्गज आणी त्यां दिग्गजांचे काही कार्यकर्ते हे भाजपच्या वरच्या फळीतील संपर्कात असून जरी ते अधिकृतरित्या तिकडे गेले नसले तरी त्यांच्या मताचा आणी जनमताचा कल सद्या जरी संभ्रमात टाकणार असला तरी त्यांचा खात्रीशीर भरवसा देतायेईलचं असे नाही.त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षातून सेना भाजपच्या गोटात जाणाऱ्यांची संख्या आणी त्यांचे राजकारणातील वय पाहता राष्ट्रवादी पक्ष हा आता प्रभावहीन पक्ष झाल्याचे दिसत असून पाटणकर गटाला आपले प्राबल्य टिकवायचे असल्यास उमेदवार त्या तोडीचाच उभा करावा लागेल.शिवाय अंतर्गत नाराजीचे सूर किमान मतदान होईपर्यंत तरी मिटवावे लागतील आणी ही डळमळीत अवस्था पुन्हा भक्कम करावयाची असल्यास राष्ट्रवादीच्या संस्थापक अध्यक्षांनी ज्या विचाराची अंमल बजावणी ज्या लोकांकडून चालवली आहे तिच अंमल बजावणी कमीत कमी ५ ते १० वर्ष तरी किमान सत्ता मिळवायची म्हणून तरी चालवली पाहिजे कारण त्यां विचार धारेत घराणेशाही चालत नसून राष्ट्रपुरुषांच्या विचारांची विचार शाही म्हणजेच लोकशाही चालते. त्याशिवाय शिवराज्य निर्माण करता येणे शक्य नाही.



















