उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.८.१२.१९
उस्मानाबाद- जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण, त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसापासून उर्वरीत कालावधीकरिता शासन राजपत्र दि. २७ नोव्हेंबर १९ नुसार सोडतीद्वारे आरक्षण खालील प्रवर्गासाठी नेमून देण्यात आले आहे.
सभापती पदाच्या आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे:-
🔹 अनुसूचित जातीसाठी राखीव पंचायत समिती सभापती पदांची आरक्षित संख्या- ०० व महिला-१
🔹 अनुसूचित जमातीसाठी राखीव पंचायत समिती सभापती पदांची आरक्षित संख्या- ० व महिला- ०
🔹 नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) साठी राखीव पंचायत समिती सभापती पदांची आरक्षित संख्या– ०१ व महिला-०१
🔹 सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव पंचायत समिती सभापती पदांची आरक्षित संख्या- ०२ व महिला-०३
वरीलप्रमाणे पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण नेमून देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी १२.०० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सोडत काढण्यात येणार आहे.
तरी या सोडतीस उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य स्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



















