चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी
दि.२४/०८/२०१८
*आरोग्य सेविका अभावी रुग्णांना ची होत आहे गैरसोय,गीता मारोती शेंडे सरपंच यांची मागणी*
चिमुर, तालुक्यातील मासळ येथून जवळ असलेले पळसगाव हे गाव मोठे असून या आरोग्य केंद्राअतर्गत येणाऱ्या गावाची लोकसंख्या ही 5000च्या घरात आहे आणि या गावाचे आरोग्य चांगले राहावे याकरिता एक उप प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु या केंद्रात एक परिचारिका कार्यरत होती,गेल्या ६ महिन्या पूर्वी त्या सेवानिवृत्ती झाल्या आहेत. सदर उपआरोग्य केंद्रा अंतर्गत पळसगाव, गोंडमोहाळी, पिपरडा, हे गावे समस्विष्ट आहेत या ठिकाणी ,गर्भवती मातेची प्रसूती ,स्तनदा मातेची ,रुणाची तपासणी व्यवस्थित होत नसल्यामुळे त्यामुळे रुग्णांच्या सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला असून, गावकरी वैतागले आहेत. तेव्हा या बाबीकडे संबंधित विभागाने गंभीरतेने लक्ष द्यावे अशी पळसगाव येथील सरपंच गीता शेंडे व ग्राम पंचायत सद्यस व नागरिकांनी मागणी केली आहे. सदर बाब अशी की, शासनाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक मोठया लोकसंख्येच्या गावात प्राथमिक उपआरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. पळसगाव येथे सुध्दा उप प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या आरोग्य केंद्रात सहा महिन्यांपासून आरोग्य सेविका पद रिक्त असल्यामुळे रुणांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नाही. रुग्णांचा उपचार व्यवस्थित होत नसून त्यांची गैरसोय होत आहे. त्यांना औषधे वेळेवर मिळत नाही. आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून, तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने या केंद्राची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागात आरोग्य चांगले नांदावे म्हणून ही सेवा सुरू केली आहे. मात्र, पळसगाव येथे रुग्णांची हेळसांड होताना दिसून येत आहे. तेव्हा या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन आरोग्य सेवा सुळळीत करावी व रूग्णांची गैरसोय टाळावी अशी मागणी पळसगाव येथील सरपंच गीता शेंडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर याना दिलेल्या निवेदनात केली आहे ,पळसगाव वासीय नागरीकांनी केली आहे.



















