नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०४.२०२०
येवला- शहराचे मालेगाव कनेक्शन असल्याने गेल्या आठवड्यापासूनच शहरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिक विशेष काळजी घेत असून रोजच वेगवेगळ्या अफवा चर्चेला येत होत्या आतापर्यत काही संशयितांच्या चाचण्याही झाल्या पण त्या निगेटिव्ह असल्याची चर्चा आहे. मात्र गुरुवारी येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेला कोरोनाची लक्षणे असल्याने ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून नाशिकला हलविण्यात आले होते. त्याच महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची सून गेल्या आठवड्यात येथील ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आली होती. येथील डॉक्टारांनी तिला नाशिक न जाता त्या महिलेला मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात नेल्याचेही सांगण्यात येते. त्यातूनच ४७ वर्षीय महिलेला आजाराची लागण झाल्याची शक्यता आहे.
महिलेच्या कुटुंबातील ९ सदस्य रुग्णालयात दाखल.
शुक्रवार (दि. २४) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेच्या कुटुंबातील ९ सदस्यांना देखील नाशिक येथे उपचाासाठी व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. येवला येथे मालेगाव वरतून येणाऱ्यांची संख्या अधिक असून रात्रीच्या वेळेस काही नातेवाईक येवल्यात येत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलीस त्यामुळे रात्री देखील दक्ष राहत असून असा प्रकार होत नसल्याचे सांगतात मात्र येवल्यात मालेगावचे कनेक्शन असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.



















