सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.१४/१२/१८
पाटण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाटण येते डॉ.सुरेशजी माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते.या सभेमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तालूका अध्यक्ष मा.अनिल माने म्हणाले कि पाटण तालुक्यातील भुकंपग्रस्त,धरणग्रस्त,प्रकल्पग्रस्त तसेच पाटण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी याचीका दाखल करणार आहे .त्याचबरोबर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.सुरेशजी माने साहेब म्हणाले कि तालुक्यात १९६७ साली भूकंप झाला आणी आता २०१८ म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्ष होत आली.मग पन्नास वर्षामध्ये पुनर्वसन का नाही ? पुनर्वसनाच्या नावाने पाटण तालुक्यातून तरुण – तरुणी शिकून तयार झाली त्यांच्या नावाने एखादे प्याकेज का नाही ?हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस काही लोकांना हा प्रश्न त्रासदायक वाटतो. त्रासदायक कोणाला वाटतो जे सत्येत आहेत त्यांना .असे अनेक प्रश्न डॉ.माने साहेबांनी तालुक्यातील जनतेसमोर निर्माण केले .हे सगळे प्रश्न घेऊन बहूजन रिपल्बिकन सोशालिस्ट पार्टी मैदानात उतरली आहे .सरकार कोणाचही असो या सगळ्या प्रश्नांचा जाब आम्ही विचारल्याशिवाय आम्ही राहनार असेही त्यांनी सरकारला फटकारले. शेतीत उत्पादन निघालं तर सरकार शेतकऱ्यांना भाव काय देत नाही आणी भावाची काय परीस्थीथी आहे हे सर्वांना चांगलच माहीत आहे.फडणवीस सरकार राज्यात मुख्यमंत्री आहेत हे म्हणाले होते शेतकऱ्यांना ४२०० रुपये सोयाबीनला भाव देतो. म्हणून सोयाबीन महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण होत अनेक बाजार पेठमधे सोयाबीनचा भाव २२०० ते २५०० वर कधी गेला नाही . सरकारने शेतकऱ्यांना तसेच जनतेला आश्वासन देण्याशिवाय कोणतही काम केलेले नाही .आणी यात असणाऱ्या दलालांनी शेतकऱ्यांना लुबाडले. त्यामध्ये शेतकरी बिचारा मेला हो. आणी हे म्हणाले ४२०० रुपये भाव देतो ४२०० रुपये सोडा हो यांना २७०० रु. सोयाबीनला भाव देता नाही आला.
🌑 आपल्या महाराष्ट्रात देशात तुरीचे उत्पादन भरपूर आहे मग जगाच्या बाजारातून तूर आणायची काय गरज तर म्हणे आपले जगातील देशांशी करार झालेले आहेत .यांच्या असल्या करारांमुळे आपल्या देशांतील शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे . हा करार झाला आहे का?
अहो असा करार झालेला देश सुध्दा त्या कराराला जुमानत नाहीत.मग भारतातील राजकारणी लोक अशा कराराला काय म्हणून जुमानतात आता अमेरिकेवाले म्हणायला लागले ना परदेशातील लोकांनी येऊन आमच्या ठिकाणी नोकऱ्या करू नयेत आमच्याच पोरांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहीजेत मग आमच्या शेतकऱ्यांनी जर म्हंटल की तूर आमची खरेदीदार आमचे व विक्रेतेदार आमचे आणी भाव आम्हीच ठरवू ,यात शेतकऱ्यांचे काय चुकलं पण ही शेतकऱ्यांनकडून भूमिका येता कामा नये.हे शेतकरी नेते खबरदारी घेतात व राजकारणी सुध्दा ही खबरदारी घेतात. शेतकरी नेते सुध्दा आता म्हणतात दीड पट भाव मिळाला पाहिजे आता प्रधान मंत्री म्हणे दोन पट देतो डबल भाव देतो अरे डबल काय भाव देतो जेवडे दीड पट आहे तेच बाजारात कोण घेत नाही तर मग दुप्पट झालेले कोण खरेदी करणार म्हणजे आणखी मार्केट पडेल आणी शेतकरी उद्वस्थ होईल म्हणून दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादनामध्ये शेतीचे उत्पन्न घटत चाललेले आहे.शेतीच उत्पन्न घटत चालतय आणी नोकऱ्या करणाऱ्या वर्गाची संख्या शेतीवरती मात्र वाढते आपल्या महाराष्ट्रामधे अटेचाळीस लाख भूमिहीन शेतमजूर आहेत त्यामधे सर्व समाजाचे आहेत. अटेचाळीस लाख भूमिहीन शेतकरी आहेत शेतमजूर वेगळे या शेतकऱ्यांनसाठी म्हणे महाराष्ट्र सरकारने योजना आणली ती योजना जुनीच आहे दादासाहेब गायकवाड जमीन वाटप योजना जी भूमिहीन आहेत त्यांना दोन दोन एकर बागायत जमीन जर बागायत नाही मिळाली तर चार एकर जिरायत जमीन वाटप.हि योजना जनतेपर्यंत पोहचुच दिली नाही नेत्यांनी असेही ते म्हणाले.आम्ही आर टी आय खाली कलेक्टरला अर्ज केला की अशी कोणती जमिनीची योजना जी योजना गरीबांनसाठी आहे कलेक्टरच उत्तर अशी काय योजना असते अशी काही माहितीच आमच्याकडे उपलब्ध नाही. “काय होणार जनतेचं”!! शेतकऱ्यांवरती गोळीबार केला यामध्ये सहा जण मरण पावले व्यापार घोटाळ्यमध्ये फक्त नोकर भरतीच्या घोटाळ्यामध्ये सात लोकांनी आत्महत्या केली.लोक शिक्षा देत नाहीत अस समजायचं नाही.
🌑भारतामध्ये कितीही मोठा कितीही ताकतवाण नेता असुदया भारतातल्या मतदानाच्या हक्कामध्ये अशी एक अदभुत शक्ती आणी ताकत आहे की तो भल्या भाल्यांची नशा उतरवल्याशिवाय राहत नाही.
कार्यक्रमाच्या दरम्यान मा.विक्रमबाबा पाटणकर सभापती बाजार समिती , स्वारिपचे जि.अध्यक्ष मा रामदास कांबळे, मा सौरभ देशपांडे ,तालुका अध्यक्ष भरत गाडे,महेश भोळे,युवराज कांबळे ,शरद विर,नंदाताई चोरगे,ज्योतिताई माने संजय डुबल,यादवराव देवकांत आदी मान्यवर उपस्थित होते .



















