सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,चंद्रकांत सुतार
दि.२९.०३.२०२०
पाटण- तालुक्यांसह पंचक्रोशीत डॉ.विजय साठे हे नाव सर्वांच्या परिचयाचे, कोरोनाचे विषाणू संकट आल्यानंतर सर्वत्र प्रचंड भितीचे वातावरण असताना अनेक डाॅक्टरांने
रुग्ण तपासणीस नकार दिला आहे असे असताना डॉ.विजय साठे आपला अनुभव व उपलब्ध साहित्याच्या जोरावर २४ आरोग्य सेवा पुरवत आहेत. ग्रामिण भागातील येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा पुरवत आहे. डॉ.साठे यांच्या सुशिला क्लीनिकचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी २४ तास उघडे आहेत. सर्वसामान्य लोक प्रचंड भीतीच्या छायेत असताना डाॅ.साठे यांच्या समाज सेवेचा विविध स्तरातून कौतुक होत असून पंचक्रोशीतून मनापासून आभार व्यक्त केले जात आहे.



















