सातार(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अनिल माने
पाटण, आपला भारत देश १९४७ ला स्वातंत्र्य झाला परंतु भारत देशाला देशातील जनतेला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले ते २६ नोहेंबर १९४९ ला कारण भारतीय घटनेचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले. या संविधान मुळे देशातील प्रजेला सत्ता मिळाली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. विविधतेने नटलेला आपला भारत देश या देशामध्ये विविध जाती,धर्म,पंत,रूढी ,परंपरा,भाषा अनेक राज्यांना एका गाठीमध्ये बांधलेलं आहे ती गाठ म्हणजे या देशाचे संविधान होय.या सोहळ्यामध्ये पाटण बाजार समितीचे सभापती मा.विक्रमबाबा पाटणकर ते म्हणाले कि संविधान हे कुठल्याही एका जाती,धर्माची मक्तेदारी नाही तर ती या देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या देशातील प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकारी यांची हि नैतिक जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.
संविधान प्रधान दिन सोहळ्या दरम्यान फत्तेसिंह पाटणकर,दिपक माने ,रविंद्र सोनवले,सजय डुबल,प्राणलाल माने,शुभम उबाळे,विजय थोरवडे,संतोष जगताप,सुधाकर देवकांत संजय कांबळे पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.



















