चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) विकास खोब्रागडे
दि. ६/०८/२०१८
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने धान पिकांची रोहणी बंद पडली यामुळे शेतकरी मोट्या चिंते मध्ये पडला आहे,सुरवातीच्या काही दिवसा अगोदर पाऊस पडल्याने काही शेतकऱ्यनी रोहणी आटोपली आहे,परंतु गेल्या २० दिवसा पासून पाऊस नाही.त्यामुळे काही प्रमाणात झालेली धान पिकाची रोहणी सध्या करपत आहे. राहिलेल्या शेतकऱ्याची रोहणी करण्याकरिता चिंतेत पडला आहे कारण सर्व नदी,नाले ,बोड्या पूर्णता कोरडे पडले आहे, शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकाला पाणी ची आवश्यकता आहे,मासळ ,अडेगाव,विहिरगांव,गोंडामोहली,पळसगांव, पिपरडा या परिसरातील पिकाची प्रस्तुत प्रतिनिधी ने पाहणी केली असता हे भयंकर संकट शेतकर्यावर ओढावले आहे,निसर्ग पाऊस शेतकऱ्याला हुलकावणी देत आहे ,यामुळे शेतकरी कर्जाच्या खाहीत लोटला आहे,शेतकरी सुखी ,तर जग सुखी अशी म्हण आहे ,पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे,जर येत्या दोन चार दिवसात पाऊस पडला नाही तर हातचे पिक निसटनार या चिंतेत बळीराजा आहे.



















