बीड (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०६.२०२१
आष्टी- आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीकविमासाठी महाराष्ट्रभर “बीड पॅटर्न” राबवा अशी मागणी पंतप्रधानकडे केली. परंतु आज बीड जिल्हाच पीकविमापासून वंचित आहे.७९८ कोटी ५८ लाखांचा भरणा करून फक्त १२ कोटी १९ लाख रुपये भरपाई मिळाली आहे.मग हा बीड पॅटर्न राबवून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनाच पिकविम्यापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्यसरकारचा आहे का..? की पिकविमा कंपन्यांच्या अडून राज्यसरकार नफेखोरी करू पाहत आहे..? असे गंभीर प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष तथा गेवराई पंचायत समितीच्या सदस्य पुजा मोरे यांनी उपस्थितीत केले आहे.



















