चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०२.२०२०
नागभीड- तालुक्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी २०१९।मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजने मधे आपल्या शेती मधील पीकाचा पिक विमा काढलेला होता. नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे धान या पिकाची फसल घेतात परंतु या वर्षी वरूनराजांनी अवकाळी पावसामुळे शेतातील धान पिकाची नुकसान झाली आहे. पीक विमा योजनेत येनोली माल येथील जवळपास ७० ते ८० शेतकरी पीक विमा काडलेला होता .त्यामध्ये फक्त ८-१० लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे बाकी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले गेले आहे, वास्तविक पाहता अवकाळी पावसामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची खूप सारी नुकसान झालेली असून फक्त बोटावर मोजण्या इतक्या ८-१० लोकांना त्याचा फायदा झालेला आहे व बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही लाभ मिळालेला नाही शेतकऱ्यांची या पीक विमा कंपनी कडून फसवणूक झाल्याचे चित्र दिसत आहेत कारण या वर्षीच्या तुलनेत अवकाळी पावसामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान झालेली आहे परंतु पीक विमा कंपनी ने मोजक्या काही लोकांनाच त्याचा लाभ दिलेला आहे त्यामुळे नागभीड तालुक्यातील शेतकरी पीक विमा कंपनी वर नाराजगी व्यक्त करीत आहे. व ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी कडून लाभ मिळाला नाही त्यांनाही पीक विमा कंपनी कडून लवकरात लवकर पीक विमा कंपनी कडून लाभ मिळावा अशी अपेक्षा नागभीड तालुक्यातील शेतकरी सरकार कडे व प्रशासना कडे अपेक्षा करीत आहेत.



















