पोलदपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
पोलादपूर बस दुर्घटना: कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस ८०० फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह ३३ जण होते, त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३८ कर्मचारी आणि २ चालक-वाहक असे एकूण ४० जण असल्याची प्राथमिक माहिती दिली. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला असे सुत्रान्नी सांगितले.दरम्यान सह्याद्री ट्रेकर्स चे संजय पारठे यांचे नेतृत्वात संजय भोसले,किरण चव्हाण,अमित कोळी,आकाश शेलार,अक्षय शेलार,धोंडीराम शेलार,अक्षय कांबळे,सुनील जाधव,वैभव जानकर,विजय केळगणे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया,सुनील केळगणे,अनिल केळगणे,बाबू वाघदरे,NDRF चे जवान पोलीस प्रशासन व स्थानिक कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी झाले होते.काल दिवस अखेर २० मृतदेह दरीतून वर काढण्यात बचाव पथकास यश आले आहे.



















