बीड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०९.२०२१
आष्टी- इ.स १९९४ मध्ये भारतातील वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण व झोपडपट्टीतील मुलांना, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत, पूर्व शालेय शिक्षण देण्याच्या उद्देशाने, २७ वर्षापूर्वी मुंबईत स्थापन झालेल्या देशव्यापी प्रथम सामाजिक संस्थेने, आतापर्यत कौशल्य विकास, रोजगार, व्यवसायभिमुख प्रशिक्षण, तसेच ज्या असर सर्वेक्षणाच्या आधारे, महाराष्ट्र शासनाने २००५ साली सर्व शिक्षा अभियान, राबवले ते शालेय मूल्यांकन, अशा विविध स्तरावर काम करणाऱ्या, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत, महाराष्ट्रातील प्रथम या सामाजिक संस्थेने, दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेल्या, महाराष्ट्रातील १०० शाळापैकी, अ. नगरमधील प्रथम संस्थेच्या कामरगाव केंद्राने निवडलेल्या परिसरातील १० शाळापैकी दौलावडगाव व कारखेल येथील जिल्हा परिषद शाळेतील नादुरुस्त असलेल्या लाईट व प्लंबिंग फिटिंगची निशुल्कपणे दुरुस्ती करत संस्थेने आपला सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.

यासोबत या ज्ञान मंदिरात आपल्याच गावातील आपलीच मुले शिकत असून, शाळेच्या सामाजिक कार्यात ग्रामस्थांनीही हातभार लावत, प.स.माजी सभापती अशोक इथापे, एकनाथ वाणी, उपसरपंच, नंदू फसले यांनी तीन सिलिंग फॅन, देत, आपला सामाजिक सहभाग नोंदवला आहे. यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे क्रस्टल हेड, श्री.दिवाकर भुयार, केंद्रप्रमुख प्रदीप बांगर, माजी सभापती अशोक इथापे सरपंच एकनाथ वाणी, कारखेल सरपंच रघुशेठ घुले, उपसरपंच. नंदकुमार फसले, मुख्याध्यापक. नंदकुमार वाणी, कारखेल मुख्याध्यापक, राजू शेकडे, रवी फसले, संतोष वनवे, सुदर्शन घुले, पत्रकार. कासम शेख, पत्रकार अर्जुन थोरात, माऊली कनगरकर आधी ग्रामस्थ व पदधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.



















