निर्भिड पत्रकार
फलटण,प्रतिनिधी
फलटण येथील बस स्थानक कर्मचारी विद्यार्थीची गैरसोय करत असल्याचे पहायला मिळत आहे. शाळा सुरु झाले असून विद्यार्थीना शालेय पास मिळवण्यासाठी तास तास ताटकळत उभे राहावे लागत असून पास वेळेत मिळत नसल्याने पास केंद्रावर गर्दी होत आहे. त्यातच कर्मचारी चे काम कासव गतीने असल्याने गर्दी मध्ये भर पडत आहे या कडे एस टी परीवाहन अधिकारी लक्ष देतील का ? आणि विद्यार्थीची गैरसोय दूर करतील का असा प्रश्न विद्यार्थी वर्गाकडुन विचारला जात आहे. हि समस्या पाहून निर्भिड पत्रकार उपसंपादक गोविंद मोरे फलटण प्रतिनिधी अमोल रणदिवे ,सुभाष जाधव यांनी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांची भेट घेऊन या संबधी विचारणा केली असता पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने पाससाठी दोनच कर्मचारी असल्याने ही गैरसोय होत आहे असे बोलले जात आहे. विद्यार्थी गैरसोय दूर करण्यासाठी मुलांसाठी व मुलींसाठी वेगळी खिडकी करून मुलांना आणि मुलींना ठराविक दिवस ठरवून दिले आहेत.त्या मुळे गर्दी कमी होऊन शालेय विद्यार्थी यांचा वेळ वाचेल व गैरसोय दूर होईल.तसेच आगरातून पुणे,नाशिक साठी तिन शिवशाही बस उपलब्ध असल्याची माहिती दिली. जावली गावासाठी मुक्कामी बस संदर्भात विचारले असता मुक्कामी बससाठी विभागीय कार्यालयाकडून परवानगीची अवश्यकता असल्याने ती लवकर मिळवुन बस सरू होईल अशी आशा व्यक्त केली.



















