सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.१२.२०२०.
फलटण- ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र किसनराव तथा आर. के. निंबाळकर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पकालीन आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (गुरुवारी) निधन झाले. राजाळे, ता. फलटण येथे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.



















