सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२५.१०.१९
सातारा- जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री विजेच्या कडकडासह झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे .गावागावातील पूल पाण्याखाली गेले तर शेतात पाणी साठवून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे फलटण तालुक्यात येथील फडतरवाडीे ओढ्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. पूर आल्याने फडतरवाडी पूल फलटण रोडवर असल्यामुळे पूल गेले किती दिवसापासून साखरवाडी ,नऊ सर्कल, जिंती, चौधरवाडी, फलटण इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. फलटण, चौधरवाडी, साखरवाडी इत्यादी येण्या-जाण्यासाठी लांबून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.



















