सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.३.२०२०
फलटण- तालुक्यातील फलटण शहरामध्ये नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे अशातच फलटण मध्ये नानापाटील चौका मध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या ट्राफीक समस्या निर्माण होत होत्या त्या मुळे नागरीकांना श्रीराम सहकारी साखर कारखाण्यापासून ते नाना पाटील चौका पर्यंत खुप ट्राफीक असायचे आत्ता यापुढे नाना पाटील चौक ट्राफीक सम्यसा सुटेल असे वाटते आहे व फलटण तालुक्यातील पाठोपाठ आता साखरवाडी येथील अतिक्रमण एक्साईज जागेमधील काढण्यात येईल का असे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. साखरवाडी ग्रामस्थ यासंदर्भात सातारा जिल्ह्याचे कलेक्टर सिंग यांना ग्रामस्थ भेटून निवेदन देणार असल्याचे समजले फलटण नगरपालीका अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना फलटण पोलीस यंत्रणा ही त्या वेळी वाहतूक कोंडी झाली असताना ट्राफीक पोलीस व पोलीस यंत्रणा भर उन्हा मध्ये रोड वर उभे राहून रोड मार्ग सुरळीत मार्गाने काढून ट्राफीक नियत्रंण केल्याचे पहवयास मिळत आहे . फलटण शहरामध्ये अतिक्रमनाचा प्रश्न अतिशय गभींर स्वरूपाचा बनला होता त्या मुळे वाहतूक कोंडी भरपूर होत होती त्या मुळे नोंद नसलेल्या बांधकामावर जेसीबी च्या व नगरपालीका कामगार याच्यांकडून नगरपालीकेने नानापाटील चौकातील गॅरेज,चहाचे दुकाने,मोबाईल शाॅप दुकाने तोडली व अतीक्रमन हटाव मोहीम सूरू ठेवली. सातारा जिल्ह्या मध्ये कोरोना रोगाचे चे प्रमान रोकन्यासाठी जिल्हाअधिकारी यांनी कुठलेही गर्दी होण्याचे सभांरभ आयोजीत केले जाऊ नये असे सांगीतले असताना देखील फलटण नगरपालीकेने अतीक्रमन हटाव मोहीम राबवली आहे या मुळे रोड वर बघ्यांची गर्दी तर मोठ्या प्रमानामध्ये कामगार वर्ग येणारे जानारे नागरीक खुप मोठ्या प्रमानात या नगरपालीका अतीक्रमन हटाव मोहीम मुळे एकत्र अाल्याचे पहायला मिळत आहे.



















