चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.१९
बल्लारपुर- मराठीमध्ये एक म्हण आहे… बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील बस स्थानकाच्या लोकार्पणाला बल्लारपूर व परिसरातील नागरिकांना नव्या बस स्थानकामधून नव्या कोऱ्या गाडीत प्रवास करायला मिळेल, असे अभिवचन दिले होते. आज ५७ बसेसचे लोकार्पण करताना त्याची पूर्तता होत आहे. सुधीर मुनगंटीवार दिलेला शब्द कायम पाळतात म्हणून ते लोकप्रिय आहेत, असे भावपूर्ण उदगार वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी काल येथे काढले. बल्लारपूर बसस्थानका मध्ये ५७ नव्याकोऱ्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्याचे वित्त, नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत त्यांचा शब्द पाळण्याचे काम वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले. काल सायंकाळी बल्लारपूर येथे झालेल्या कार्यक्रमाला चंदनसिंग चंदेल यांच्या सह बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आर.जी.कांबळे, श्री सांगवीकर, विभागीय नियंत्रक राजेंद्र कुमार पाटील, श्री. भागेकार, श्री हेडावू, श्री. व्ही एस जोग, शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह , मनीष पांडे, समीर केने, येलय्या दासरफ, राजू गुंडेटी, राजू दारी, वैशाली जोशी, आशा संगीडवार, सुर्वणा भटारकर, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, राकेश यादव, रेणुका दुधे, स्वामी रायबरम, पुनम निरांजने, कांता ढोके, सतीश कणकम, देवेंद्र वाटकर आदींची उपस्थिती होती. बल्लारपूर बस स्थानकाचे लोकार्पण करताना सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये २०० नवीन बसेस नागरिकांना दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. राज्यामध्ये नव्याकोऱ्या बसेस ह्या चंद्रपूर गडचिरोलीच्या प्रवाशांना देखील ग्रामीण भागात मिळाल्या पाहिजे याबद्दल त्यांनी भाष्य केले होते. त्यामुळे त्यातील पहिल्या ५७ बसेस आज जनतेच्या सेवेत रुजू होत असल्याचा आनंद चंदेल यांनी व्यक्त केला. यावेळी बोलतांना बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी बस स्टँडच्या उदघाटनाच्या वेळेस दिलेला शब्द भाऊंनी पाळल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यासोबतच त्यांनी बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल या परिसरात गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांचा आढावा यावेळी सादर केला. महाराष्ट्रातील सर्वांग सुंदर अशा विकसित भागात आता आधुनिक बसेसच्या माध्यमातून लोकांची सेवा करायला मिळत असल्याबद्दल त्यांनी सुधीर भाऊंचे आभार मानले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नव्या बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रवाशांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. बल्लारपूर परिसरात आता या नव्या बसेस चर्चेचा विषय असून आणखी दीडशे बसेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धावणार आहेत.



















