चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०७.१९
नागभिड- तालुक्यातील येनोली (माल) ते गोविंदपूर पांदन रस्त्याचे डांबरीकरण हे या एका महीन्या अगोदर रस्त्याचा काम झाले असुन पहिल्या पाऊसात रस्त्याला मध्यभागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने जातांना नागरीकाची दमछाक होत असून वाहन धारकाना आपले वाहन काढताना व वाहनाला साईड देताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्या रस्त्या कडे बांधकाम विभाग प्रशासनाचे कसल्याही
प्रकारच लक्ष नसल्याचे नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची पहिल्या पावसात ही परीस्थीती निर्माण झाली आहे,तर मुसळधार पावसात रोड पूर्णतः बंद होतो की काय ही परिस्थिती आहे. कामाचे कंत्राटदारानी थातूर मातूर काम करुण मोकळे झाले पण आता तो रस्ता दुरुस्त करन देणार कोण ? ही खळबळ प्रवाशांनमध्ये सुरु आहे. एकीकडे सरकार म्हणते की खड्डे मुक्त महाराष्ट्र व आज अशी स्थिती आहे की एक महीना बरोबर झाला नाही व रस्त्याला खड्डे आता कुट गेले शासन? प्रशासनावर नागरीक त्या रस्त्यामुळे असंतोष जनक विचार मांडत आहेत. प्रशासना वरती जनता नाराज असून तात्काळ सदर रोड ची दुरुस्ती करून देण्याची परिसरातील नागरिकांची मागणी आहे.



















