बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०७.२०२०
बीड- लॉकडाऊनच्या काळात सरकार शेतकऱ्यांना मोफत बांधावर बी- बियाणे आणी खते देणार होते हे तर लांबच राहील पण शासनाला शेतकऱ्यांचा राहिलेला कापूस सुद्धा घेता आला नाही याउलट बोगस बी- बियाणे, बोगस खते सर्रास विक्री केले जातायेत यावर शासनाचा अंकुश नाही मात्र खेड्यापाड्यातही विज बिले घेण्यास विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे. शेतकरी पेरणी बी- भरणा मुळे जाम अडचणीत आहे तो कर्जबाजारी झाला आहे त्यातच काही शेती मंडळ पीक विम्या पासून वंचित आहे यामुळे शेती करावी का नाही हा प्रश्न समोर असतानाच विज कर्मचारी भले मोठे बिल घेऊन शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे. हेच का आपल शेतकऱ्यांच सरकार? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आल्या वाचून राहत नाही. बांधावर बी-बियाणे, खते देणार होतात ,आपण विज बिल माफ करणार होतात, लॉक डाऊन काळात सरकार दिलेले वचणे पाळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र प्रत्यक्षात घडतयं वेगळच .एकीकडे तीन महिने मोफत विज,मोफत राशन,मोफत इंधन आपण घोषित करत मात्र प्रत्यक्षात यातील फार कमी गोष्टी अमलात आणल्या जनतेच मायबाप सरकार या नात्याने गोरगरीब शेतकऱ्यांची विज बिले माफ करावीत अशी विनंती डॉ.वंजारी यांनी केली आहे.
तीन महिन्यात रिडींगलाही कोणी आले नाही व काही जणांची अंदाजे बिले आकारली आहेत तीही अवाजवी आहेत ती शेतकऱ्यांना न परवडणारी आहेत ती तात्काळ रद्द करा आणी लॉक डाउन काळात सर्व बिले माफ करा असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले. ते म्हणाले कोरोना महामारीने सर्वच शेतकरी हैराण आहेत काही शेतकऱ्यांची उन्हाळी नगदि पिके वाया गेली त्यामध्ये डांगर, टरबूज, खरबूज, काकडी, डाळिंब, द्राक्षे व इतर फळबाग अशी पिके बाजारपेठ बंद असल्या कारणाने शेताततच सडून गेली त्यांना खर्च झाला तो सुद्धा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांचा कापूस अजून घरात सडतो आहे पण शासनाचे याकडे लक्ष नाही आणी यातच विज बिले गगनाला भिडली आहेत. काहींची मोघम अवाजवी बिले आकारली आहेत यामुळे सामान्य शेतकरी,कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे म्हणून करिता शासनाने वीजबिल माफ करून शेतकऱ्यांवर आकारले जाणारे अवाजवी विज बिले माफ करावीत सोयाबीन-बी न उगवल्याने तात्काळ संबंधित कंपनी वर कायदेशीर कार्यवाही करून त्याचा मोबदला सक्तीने कंपनी ला द्यायला भाग पाडावे, कापूस उत्पादक उरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी व बोगस खते आणी बी-बियाणे उत्पादक कंपनीन वर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांची पीककर्जे तात्काळ खात्यावर वर्ग करावीत असे मत डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.



















