पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०२.२०२१
पुणे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे येथिल कान्फरन्स हॅाल मध्ये शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रवींद्र कदम, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी व अधिकारी कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते. शिवाजी नगर पुणे- ५, येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विकास पासलकर, अध्यक्ष अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती यांनी धम्मज्योती गजभिये यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले. यावेळी पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



















